Friday, October 22, 2021

मंत्री शंकरराव गडाखांनी दिले आदेश तयारीला लागा…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाच्या शिवसंपर्क अभियानाचा प्रारंभ शहरातील गोरे मंगल कार्यालयात मंत्री शंकरराव गडाख यांच्याहस्ते शनिवारी करण्यात आला. याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख डॉ. विजय पाटील, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, उपजिल्हा प्रमुख रामदास गोल्हार, सुनील पालवे, महिला जिल्हा संघटक मंगल म्हस्के, प्रवीण अनभुले,

शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाचे संघटक भगवान दराडे, तालुकाप्रमुख अंकुश चितळे, शेवगाव तालुकाप्रमुख अविनाश मगरे, माजी पं. स. सदस्य विष्णूपंत पवार, महिला जिल्हा संघटक मंगल म्हस्के, प्रवीण अनभुले, सविता ससे, ज्येष्ठ नेते एकनाथ कुसळकर, नवनाथ चव्हाण, मीरा बडे, राजेंद्र म्हस्के, सागर राठोड, भारत लोहकरे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख सचिन नागापुरे आदी उपस्थित होते.

करोनाशी लढत विकासकामांचा डोलारा सांभाळण्याची कसरत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. त्यांना आधार देण्यासाठी पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी शिवसैनिकांवर आहे. जुना-नवा असा भेद करू नका. शिवसैनिक, बूथप्रुमख संघटनेचा आत्मा आहे. शिवसैनिकांनी निवडणुकीची तयारी करावी, असे आवाहन जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी केले.

यावेळी मंत्री गडाख म्हणाले पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील 70 जुन्या तलावाच्या दुरुस्ती व खोलीकरणासाठी सोळा कोटी रुपये व चौदा बंधार्‍यांसाठी दहा कोटींचा निधी देण्यात येत आहे. विकासाची कामे घेऊन जनतेच्या दारात जा. करोनाच्या स्थितीत जनतेचा आधार बना.तालुकाप्रमुख अंकुश चितळे यांनी प्रस्ताविक व सुखदेव मर्दाने यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश मगरे यांनी आभार मानले.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!