Sunday, October 17, 2021

बाळासाहेब थोरात म्हणाले पवार- मोदी भेटीत मला काहीच…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी भाजपसह अन्य पक्षातील काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी थोरात यांनी संवाद साधला.

राज्याच्या दृष्टीने अनेक विषय केंद्र सरकारशी निगडीत आहेत. त्यासाठी पवार यांनी मोदींची भेट घेतली, असे मला वाटते. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, लसीकरण, कृषी कायदे, नव्याने स्थापन झालेले सहकार मंत्रालय, सहकारी बँकांवरील निर्बंध, त्याचा सहकारावर होणारा परिणाम, जीएसटीचा परतावा यासंबंधी चर्चा करण्यासाठी पवार यांनी मोदींची भेट घेतली असेल.

केंद्र सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी राज्याची जबाबदारी त्यांच्यावर असतेच. त्यानंतर संजय राऊत पवारांना भेटले, यातही मला काहीच आश्चर्य वाटत नाही. राऊत खासदार आहेत, तेही दिल्लीत असल्याने पवार यांना भेटले असतील, असेही थोरात म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील भेटीचे आपल्याला काहीच आश्चर्य वाटत नाही. पूर्वी सर्वपक्षीय नेते असे भेटत असत. अशा भेटींची राजकीय चर्चा करण्याची प्रथा भाजपनेच सुरू केली,’ असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

थोरात म्हणाले, ‘पवार- मोदी भेटीत मला काहीच आश्चर्यकारक वाटत नाही. लोकशाहीत मतमतांतरे असतात. मात्र कामानिमित्त एकमेकांना भेटावे लागते. पूर्वीच्या काळी सर्व पक्षाचे लोक एकत्र भेटत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील लोक एकत्र येत जेवणही करीत.

काळाच्या ओघात भाजप पुढे आला आणि त्यांनी वेगळे राजकारण सुरू केले. त्यामुळे आता अशा भेटींचे आश्चर्य वाटू लागले आहे.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!