Saturday, October 23, 2021

उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करा या दिग्गज नेत्याचं मोठं विधान

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना काळात सर्वोत्तम कामगिरी केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  पुन्हा एकदा देशात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकप्रिय ठरले आहे त्यामुळे त्यांना पंतप्रधान करा’ असं वक्तव्य काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने पुण्यात आंदोलन करण्यात आलं. यावेळी  मोदी सरकारच्या विरोधात इंधन दरवाढ विरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी सायकल रॅली, रस्त्यावर चूल मांडून निषेध केला. यावेळी बोलत असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

भाजपचे विरोधी पक्षनते देवेंद्र फडणवीस किती खोटं बोलतात हे मी म्हणत नाही. तर आकडेवारी सांगत आहे. मी आकडे मांडली आहे. ते मुख्यमंत्री असतांना काय निर्णय घेतले? हे सर्वांना माहिती आहे, अशी टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकप्रिय ठरले आहे. त्यामुळे त्यांना पंतप्रधान करा’, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पण, असं म्हणत असताना चव्हाण यांना राहुल गांधी यांचा विसर पडला.

केंद्राने तेल कंपन्यांना सूट दिल्यामुळे तेल कंपन्यांना फायदा झाला, नागरिकांचे त्यामुळे कंबरडे मोडले. पेट्रोल आणि डfझेलची तीच परिस्थिती झाली. महागाई मोठ्या प्रमाणात झाली त्यामुळे अनेकांचे कंबरडे मोडले आहे. कोरोनामुळे साडेबारा कोटी लोकांचे रोजगार गेले. देशातील 23 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली गेले आहे.

  आमच्या सरकारने 14 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेतून बाहेर काढले होते. कोरोनाच्या आधीपासून महागाई सुरू झाली होती, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!