Friday, October 22, 2021

राज्यात पुन्हा काँग्रेसची लाट येणार : ना. थोरात

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शिर्डीत काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी आ. डॉ. सुधीर तांबे, डॉ. एकनाथ गोंदकर, काँग्रेस कमिटीचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले, लताताई डांगे, श्रीकांत मापारी, विक्रांत दंडवते, स्वराज त्रिभुवन,

अमृत गायके, सुरेश आरणे, अ‍ॅड. अविनाश शेजवळ, मदन मोकाटे, समीर शेख आदी पदाधिकार्‍यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.शिर्डी विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाची पुन्हा एकदा नव्या जोमाने मोर्चेबांधणी सुरु झाली. पुष्पक रिसोर्ट येथे आयोजित कार्यक्रमात कॉ्ंग्रेस पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले.

सध्या तरुणांचा काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग याचा अर्थ वातावरण बदलले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसची लाट येणार आहे. आगामी काळात शिर्डी नगरपंचायतच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

शिर्डी नगरपंचायत निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याबाबतचा निर्णय देश व राज्यपातळीवर घेतला जाईल. मोदी-पवार भेटीत आश्चर्य वाटलं नसल्याचे त्यांनी सांगितले. शिर्डी नगरपंचायतच्या आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

 

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!