Wednesday, October 27, 2021

रोहित पवार म्हणाले सामाजिक तेढ निर्माण करण्याचा भाजपचा डाव

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मराठा व ओबीसी हे दोन्ही आरक्षण हा केंद्राच्या अखत्यारितील विषय आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा भाजपचा डाव आहे. राज्यात भाजप ज्या ओबीसी नेत्यांनी रुजविला, वाढविला त्यांची आज काय अवस्था आहे.असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.

शहरातील संस्कार भवन येथे कोरोना योद्धा पुरस्कार वितरण व ॲड. प्रताप ढाकणे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके होते. व्यासपीठावर प्रताप ढाकणे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे,

शेवगाव पंचायत समिती सभापती डॉ. क्षितिज घुले, ऋषिकेश ढाकणे, गहिनीनाथ शिरसाट, किरण शेटे, बंडूपाटील बोरुडे, बालासाहेब ताठे, सिद्धेश ढाकणे आदींसह मान्यवर उपस्थित होते.पवार म्हणाले, ५३ वर्षांपूर्वी ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांनी या भागात विकासाची मुहूर्तमेढ रोवली.

वीज यावी यासाठी मोठे आंदोलन केले तेव्हा कोठे पाथर्डीत वीज आली. प्रताप ढाकणे यांच्यातीन पिढ्यांचा संघर्ष आपण पाहात आहाेत. राष्ट्रवादीत जो संघर्ष करतो त्याला न्याय मिळतो. याउलट स्थिती भाजपमध्ये आहे. तेथे कोणी मोठे झालेले आवडत नाही.

प्रताप ढाकणे यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जयंत पाटील यांच्याशी बोलून मी प्रयत्न करेन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!