Wednesday, October 27, 2021

नगर ब्रेकींग:शेतात लाकड आणण्यासाठी गेलेल्या मायलेकींचा मृत्यू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नजीक कानुगडेवाडी येथील मायलेकी घरातील स्वयंपाकासाठी शेतात जळाऊ लाकड आणण्यासाठी गेलेल्या मायलेकींचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.१७) सकाळी घडली.

या घटनेमध्ये आशा राजू उकिरडे (वय ४२), उमा राजू उकिरडे (वय १६) या मायलेकींचा मृत्यू झाला. घरातील स्वयंपाकासाठी सकाळी साडेअकराच्या सुमारास शेतात जळाऊ लाकूड आणण्यासाठी गेलेल्या मायलेकी सायंकाळ झाली तरी घरी आल्या नाहीत. त्यामुळे पती राजू उकिरडे आणि शेजारी यांनी परिसरात शोध घेतल्यानंतर कानुगडेवाडी शिवारातील संदीप कानुगडे

यांच्या शेतातील विहिरीजवळ स्कार्प व पांढऱ्या रंगाचे दावे दिसून आले. त्यामुळे विहिरीत पाहिले असता आशा उकिरडे यांचा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसून आला. मात्र, मुलीचा शोध लागत नव्हता. विहिरीतील पाण्यावर दोघींच्या पायातील चपला तरंगताना दिसत होत्या. शनिवारी मध्यरात्री आशा यांचा मृतदेह

विहिरीतून बाहेर काढल्यानंतर त्यांची मुलगी उमाचा पोलीस आणि ग्रामस्थांनी शोध घेतला. मात्र, मृतदेह सापडत नव्हता. मृतदेह रविवारी (दि.१८) सकाळी शोधल्यानंतर त्याच विहिरीत सापडला.घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी घटनास्थळी येऊन विहिरीत उतरून आशा यांचा मृतदेह बाहेर काढला व पंचनामा केला.

विहिरीजवळील लिंबाच्या झाडाच्या वाळलेल्या फांद्या काढत असताना पाय घसरून मुलगी विहिरीत पडली असावी. मुलीस वाचविण्यासाठी गेलेली आईही विहिरीत बुडाली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!