Monday, October 25, 2021

नगर जिल्ह्यातील हा राष्ट्रवादीचा नेता म्हणाला भाजप सोडले ते चांगलेच झाले….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:प्रताप ढाकणे यांच्यावरही भाजपमध्ये अन्याय झाला. संघर्ष करणारे कुटुंब म्हणून ढाकणे कुटुंबाकडे पाहिले जाते. ढाकणे कुटुंबाचा संघर्ष राष्ट्रवादी काँग्रेस वाया जाऊ देणार नाही, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरातील संस्कार भवन येथे कोरोना योद्धा पुरस्कार वितरण व ॲड. प्रताप ढाकणे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके होते. व्यासपीठावर प्रताप ढाकणे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे,, शेवगाव पंचायत समिती सभापती डॉ. क्षितिज घुले,

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, ऋषिकेश ढाकणे, गहिनीनाथ शिरसाट, किरण शेटे, बंडूपाटील बोरुडे, बालासाहेब ताठे, सिद्धेश ढाकणे आदींसह मान्यवर उपस्थित होते.प्रताप ढाकणे म्हणाले, सध्या पाथर्डी तालुक्याला कोणी वाली राहिला नाही. कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. आपल्याला खंबीर व्हावे लागेल. सत्तेसाठी लाचार होणारा मी नाही. तुम्ही पाण्यासाठी व विकासासाठी आम्हाला मदत करा.

भाजप सोडले ते चांगलेच झाले…

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे भाजपमध्ये गेलो होतो. मात्र माझे तिथे काही जुळले नाही. त्यामुळे पुन्हा मी राष्ट्रवादीत आलो. भाजप सोडले ते चांगले झाले. आज भाजपमध्ये आमच्या भगिनी (पंकजा मुंडे) व नाथाभाऊ खडसे यांचे काय झाले हे महाराष्ट्र पाहात आहे.

मतदारसंघातील लाखो लोकांनी मला मते दिली. जनतेचे माझ्यावर प्रेम आहे. तीच माझी ताकद आहे, असे प्रताप ढाकणे म्हणाले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!