Monday, October 25, 2021

या जिल्ह्यांना हवामान खात्याचा रेड अलर्ट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आज मुंबईसह कोकणातील तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आजही मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.पुढील काही तासांत मुंबईसह पालघर, ठाणे, पुणे सातारा आणि कोल्हापूर परिसरात देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

दरम्यान 50 ते 60 किमी प्रती तास इतक्या वेगानं वारा वाहण्याची शक्यता आहे. कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांत मुसळधार सरी कोसळणार आहेत. ठाणे, कल्याण, डोंबिवलीला काल रात्रभर मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. त्यामुळे ठाण्यात बऱ्याच ठिकाणचे रस्ते तुडुंब भरुन वाहत होते. आजही ठाणे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात मान्सूनची वापसी झाल्यापासून कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. कोकण किनारपट्टीवरील परिसरात तर गेल्या आठवड्यापासून संततधार सुरू आहे. आजही कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांला भारतीय हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे.

तसेच पुढील 24 ते 36 तासांत कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!