Monday, October 25, 2021

नगर जिल्ह्यातून महिलेच्या सांगण्यावरून  5 लाख रुपयांच्या मागणीसाठी तरूणाचे अपहरण करून…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:प्रमिला नामक महिलेच्या सांगण्यावरून 5 लाख रुपयांच्या मागणीसाठी मनमाडच्या स्वामी जनार्दन नगर येथील सचिन वसंत जाधव या तरुणाचे कोपरगाव शहरातील बसस्थानक येथून 15 जुलै रोजी दुपारी पांढर्‍या रंगाच्या इर्टीगा कारमधून आलेल्या अज्ञात तिघे इसम व एक अज्ञात महिला यांनी अपहरण केले होते.

याबाबत अपहरण झालेल्या तरुणाची पत्नी भावना जाधव यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करत होते.शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक गोष्टींच्या

आधारे पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथील एका घरात डांबून ठेवलेल्या अपहरणग्रस्त तरुणाची सुटका करत एकनाथ हरिभाऊ हाडवळे रा.राजुरी , ता.जुन्नर, भाऊसाहेब विठ्ठल काळे रा. आळेफाटा , ता.जुन्नर, प्रवीण रबाजी खेमनर रा.अंभोरे , ता.संगमनेर, प्रमिला महेश पवार रा.चेहेडी, ता.जि. नाशिक व सीमा भाऊसाहेब काळे रा.आळेफाटा, ता.जुन्नर यांना ताब्यात घेऊन 6 लाख

रुपयांची इर्टीगा कार ( क्र . एमएच .14 , जेए .6572 ) आणि गुन्ह्यात वापरलेले दहा हजार रुपयांचे दोन मोबाईल असा 6 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाइर्त पोलीस उपनिरीक्षक बी.सी.नागरे, पो.कॉ.जी.पी.थोरात, पी.बी.बनकर, महिला पोलीस विजया दिवे, पो.ना.फुरकान शेख, गृहरक्षक दलाचे जवान दीपक गर्जे आदींनी केली आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!