नेवासा/प्रतिनिधी
शेतक-याचा कांदा चोरी करणा-या दोन चोरट्यांना, कांदा चोर बाजारात विक्री करण्याचे आत गुन्ह्यात वापरलेल्या चारचाकी वाहणासह जेरबंद करण्यात आले नेवासा पोलीसांना यश आले आहे. पोलीस निरीक्षक दराडे यांनी ठोस अधिकाराचा वापर करत सदरचा कांदा हा तात्काळ मुळ शेतक-यास दिला.
याबाबदची हकीगत अशी की, फिर्यादी सुधिर आसाराम लंघे (वय ४० वर्ष), रा. शिरसगाव ता. नेवासा जि. अहिल्यानगर यांनी दि.२० ऑगस्ट रोजी फिर्याद दिली की, त्यांचे शेत गट नं. ५१/२ गळनिंब ता. नेवासा शिवारातील शेतातील पत्र्याचे शेड मधिल सुमारे ४० गोणी कांदा हा कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वत:च्या फायद्याकरीता लबाडीच्या इराद्याने चोरून नेला आहे.
या फिर्यादीवरून नेवासा पोलिस स्टेशनला गु.र.नं. ७००/२०१६ बी.एन.एस.३०३(२) प्रमाणे गुन्हा रजिस्टर करण्यात आला आहे. सदरच्या गुन्ह्याचा तपास हा वरीष्टांचे आदेशाने पोहेकाँ सुधाकर दराडे यांच्याकडे देण्यात आला होता. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या सुचनाप्रमाणे बारकाईने लक्ष ठेउन तपास करत असतांना कांदा व्यापारी घोडेगाव यांच्याकडून सदरचे कांदा शेतकरी यांना तसेच पोहेकाँ सुधाकर दराडे यांना दोन इसम हे कांदा विक्रीसाठी घेऊन आले व सुमारे २७ गोणी कांदा हा लिलावासाठी ठेउन गेले आहेत,अशी माहीती मिळताच पोहेकाँ दराडे यांनी पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शन व सुचने प्रमाणे तपासाची चक्रे वेगाने फिरवत कांदा विक्री साठी घेऊन गेलेले प्रविण बाळासाहेब माळी (वय 19 वर्ष), रा. गिडेगाव ता. नेवासा व अक्षय विजय अंगरख (वय 21 वर्ष), रा. सलाबतपूर ता. नेवासा
दोन इसम हे नेवासा फाटा परीसरात वावरत असल्याची माहीती मिळाल्याने त्यांना पळून जाण्याचे तयारीत असतांना पोलीसांनी वेळीच जेरबंद केले आहे. त्यांना पोलीस स्टेशन येते घेऊन येऊन चौकशी दरम्यान ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्यांना सदर गुन्ह्यात अटक करून त्यांना पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी सदर शेतकरी यांच्याकडे आम्ही कांदा भरण्याचे मजुरी कामासाठी गेलो होतो. व शेतक-याचे कांदा शेडमध्ये राहीलेला उर्वरीत कांदा (४० गोणी) हा आम्ही दुस-या दिवशी रात्रच्या वेळेला कांदा शेडचे कुलूप तोडुन सदरचा कांदा हा आम्ही दोघांनी आमच्याकडील चारचाकी महिंद्रा पिकअप या गाडीमधून चोरून तो पाच दिवस तो लपवून ठेउन दि.३१/०८/२०२६ रोजी पहाटे घोडेगाव येथे कांदा मार्केट मध्ये लिलावासाठी ठेवलेला असल्याचे सांगीतले.
त्यानंतर तात्काळ पोलीस निरक्षक प्रताप दराडे यांनी सदर कांदा वक्कलचा निलाव न करणेबाबत समंधित कांदा व्यापारी यांना आदेशीत करून, तात्काळ सदरचा कांदा पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे. तसेच गुन्हा करण्यासाठी आरोपी यांनी वापरलेले महिंद्रा पिकअप हे चारचाकी वाहन हे देखील आरोपी यांनी लपवून ठेवलेल्या ठिकाणाहून जप्त करण्यात आले आहे. तरी सदरचा शेतमाल (कांदा) हा नाशवंत असल्याने शेतक-याचे कोणतेही नुकसान होऊ नये करीता पोलीस निरीक्षक दराडे यांनी न्यायालयीन गुंतागुत बाजुला ठेऊन स्वत:च्या काही ठोस अधिकाराचा वापर करून सदरचा जप्त कांदा हा वेळ न दवडता मुळ शेतकरी यांच्या ताब्यात दिला आहे. तरी आरोपी यांच्याकडून २७ गोणी कांदा व एक मंहिद्रा पिकअप हे चारचाकी वाहण जप्त करण्यात आले असुन एकुन ५ लाख ३६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जागीच जप्त करण्यात आला आहे.
*पोलिसांचे आवाहन…
नेवासा तालुक्यातील सर्व जणतेला आवाहन करण्यात येते की, अशाच प्रकारे कोणत्याही शेतक-याचा कांदा अथवा इतर शेतमाल हा चोरट्यांनी चोरी केलेला असेल तर नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरक्षक प्रताप दराडे यांचा मो.नं.७३८५५५३१२० व पोलीस हवालदार सुधाकर दराडे यांचा मो. नं. ९६२३७७०७९९
याच्यावर त्वरीत संपर्क साधावा.


