Wednesday, November 25, 2026

शिवसेना शेतकरी सेनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी नानासाहेब बच्छाव यांची निवड

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नांदगाव, दि. २५ :*शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने, शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील आणि खजिनदार पद्माकर मोराडे यांनी शिवसेना शेतकरी सेनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते मा. नानासाहेब उत्तमराव बच्छाव यांची निवड केली. यावेळी त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

 

नानासाहेब बच्छाव हे नांदगाव तालुक्यातील हिंगणे-देहरे गावचे माजी सरपंच आहेत. ते गेली अनेक वर्षे शेतकरी चळवळीत सक्रियपणे काम करत आहेत. ग्रामीण भागातील छोट्याशा गावातील, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्त्याला शिवसेना नेतृत्वाने मोठी संधी दिल्याने गावगाड्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नाशिक जिल्हा हा शेतकरी चळवळीचा केंद्रबिंदू मानला जातो. त्यामुळे पुढील काळात शिवसेनेच्या माध्यमातून शेतकरी चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बच्छाव हे जोरदार प्रयत्न करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या निवडीबद्दल नाशिक जिल्ह्यातील शिक्षणमंत्री दादाजी भुसे, आमदार सुहास अण्णा कांदे, आ. गोकुळ गिते आ. किशोर दराडे मा.विजय आप्पा करंजकर, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, उपमहापौर विलास अण्णा शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आनंद व्यक्त करून बच्छाव यांचे अभिनंदन केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!