Wednesday, November 25, 2026

कामगार कल्याण मंडळाच्या नाशिक विभागाअंतर्गत १४१३९ लाभार्थ्यांना ५ कोटी ५८ लाख रुपयांची आर्थिक मदत-भावना बच्छाव

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नाशिक/प्रतिनिधी

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाशिक विभागाअंतर्गत नाशिक अहिल्यानगर, धुळे,जळगाव, नंदुरबार या पाच जिल्ह्यातील १४१३९ लाभार्थ्यांना २०२४-२५ व २०२५-२६ या दोन आर्थिक वर्षात ५ कोटी ५८ लाख ११ हजार ७९८ रुपयांची आर्थिक मदत देण्यात आल्याची माहिती नाशिक विभागाच्या सहाय्यक कल्याण आयुक्त श्रीमती भावना बच्छाव यांनी दिली.

अधिक माहिती देतांना श्रीमती बच्छाव पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री अड.आकाश फुंडकर, राज्यमंत्री अड.आशिष जयस्वाल, अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती.आय.ए. कुंदन(आयएस) व कामगार तथा कामगार कल्याण मंडळाच्या उपसचिव रोशनी कदम पाटील,आयुक्त नंदलाल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक प्रादेशिक विभागांतर्गत येणाऱ्या नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे व नंदुरबार या ५ जिल्ह्यांमधील नोंदणीकृत कामगारांच्या कुटुंबातील घटकांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळा मार्फत विविध कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातो.
या कल्याणकारी योजनांमुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
नाशिक विभागांतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ७१६५ लाभार्थ्यांना ३ कोटी १ लाख ५९ हजार ७४४ रुपयांची तर सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात एकूण ६९७४ लाभार्थ्यांना २ कोटी ५६ लाख ५२ हजार ५४ रुपयांच्या निधीचे वितरण थेट त्यांच्या बँक खात्यात (डीबीटी द्वारे) करण्यात आले आहे.

*सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील लाभार्थी संख्या व त्यांना योजनांनुसार मिळालेली आर्थिक मदत पुढील प्रमाणे….

गंभीर आजार वैद्यकीय उपचार सहायता योजना ४४९ लाभार्थी (८६ लाख ७५ हजार रुपये),सर्वसाधारण शैक्षणिक अर्थसहाय्य योजना ५६४१ लाभार्थी (१ कोटी ७४ लाख ९४ हजार रुपये), क्रीडा अर्थसहाय्य योजना ९ लाभार्थी (४६ हजार रुपये),परदेश शैक्षणिक अर्थसहाय्य योजना ३८ लाभार्थी (१९ लाख रुपये), पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य योजना ४६८ लाभार्थी (६ लाख ३८ हजार ३५९ रुपये), एम.एस.सी.आय.टी. सहाय्यता योजना ५०३ लाभार्थी (११ लाख ७४ हजार ७५ रुपये), शिवणयंत्र अनुदान योजना १४ लाभार्थी (६४ हजार २६० रुपये), शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा जीसीसी-टीबीसी आर्थिक सहाय्य योजना ३४ लाभार्थी (१ लाख २३ हजार ५० रुपये), एमपीएससी-यूपीएससी आणि पीएच.डी अर्थसहाय्य योजना ३ लाभार्थी (१५ हजार रुपये), गुणवत्ता प्राप्त कामगार पाल्याचा सत्कार ६ लाभार्थी (३० हजार रुपये), असे एकूण ७१६५ लाभार्थ्यांना ३ कोटी १ लाख ५९ हजार ७४४ रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.

*सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील लाभार्थी संख्या व त्यांना मिळालेली आर्थिक मदत पुढील प्रमाणे….

गंभीर आजार वैद्यकीय उपचार सहायता योजना १६३ लाभार्थी (३५ लाख १० हजार रुपये),साहित्य प्रकाशन अनुदान योजना १ लाभार्थी (१० हजार रुपये),सर्वसाधारण शैक्षणिक अर्थसहाय्य योजना ५६९४ लाभार्थी (१ कोटी ८० लाख ४४ हजार रुपये), क्रीडा अर्थसहाय्य योजना ७ लाभार्थी (३० हजार रुपये),परदेश शैक्षणिक अर्थसहाय्य योजना २८ लाभार्थी (१४ लाख रुपये),पाठ्यपुस्तक अर्थसहाय्य योजना ३४४ लाभार्थी (४ लाख ८६ हजार ९६० रुपये), एम.एस.सी.आय.टी. सहाय्यता योजना ५४८ लाभार्थी (१२ लाख ८२ हजार ३१४ रुपये), शिवणयंत्र अनुदान योजना १३ लाभार्थी (५९ हजार ६७० रुपये),शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा GCC-TBC आर्थिक सहाय्य योजना
६९ लाभार्थी ( २ लाख ९७ हजार रुपये), एमपीएससी- यूपीएससी आणि पीएच.डी अर्थसहाय्य योजना ५ लाभार्थी (२५ हजार रुपये),गुणवत्ता प्राप्त कामगार पाल्याचा सत्कार १३ लाभार्थी (६५ हजार रुपये),वाहन चालक अर्थसहाय्य योजना ९० लाभार्थी (४ लाख ४२ हजार ११० रुपये), अशा एकूण ६९७४ लाभार्थ्यांना २ कोटी ५६ लाख ५२ हजार ५४ रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!