माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी मागे घेणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर कांद्याच्या भावात सुधारणा दिसून आली. कांद्याचे भाव क्विंटलमागं ३०० ते ४०० रुपयांपर्यंत वाढले.
सरासरी भाव १ हजार ६०० ते १ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय.मात्र निर्यातबंदी मागे घेतल्याची अधिसूचना सरकारने अद्यापही काढली नाही. पण सरकारच्या घोषणेचा बाजाराला फायदा झाला.
दुसरीकडे बाजारातील कांदा आवक टिकून आहे. तसेच कांदा भावातील ही सुधारणा टिकून राहील, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. देशातील बाजारात कापसाच्या भावातील
सुधारणा कायम आहे. बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. याचा आधार कापूस बाजाराला मिळत आहे. देशातील अनेक बाजारात कापसाचा कमाल भाव ७ हजार ५०० रुपयांवर पोचला.
तर सरासरी भाव ६ हजार ८०० ते ७ हजार १०० रुपयांच्या दरम्यान आहे. कापसाला चांगली मागणी असल्याने कापसाचे भाव यापुढील काळातही कायम राहतील. तसेच बाजारातील आवक
कमी होत गेल्यानंतर दरात आणखी वाढ होईल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.