नेवासा:महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज नेवासा तालुक्यातील भेंडा व गोंडेगाव येथे हनुमान माध्यमिक विद्यालय या विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी सावता परिषद अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठल फुलसौंदर, युवक आघाडी कृष्णाई उद्योग समूहाचे आबा काळे ,जिल्हाध्यक्ष नंदू चौधरी, युवक आघाडी कार्याध्यक्ष रामेश्वर पुंड, सावता परिषद नेवासा तालुकाध्यक्ष शरद तांबे, सावता परिषदेचे जिल्हा प्रवक्ते मल्हारी आखाडे, सावता परिषद युवक आघाडी नेवासा तालुकाध्यक्ष अमोल गारुडे, शनिश्वर देवस्थान गोंडेगाव अध्यक्ष दिगंबर वाघुले, शनिश्वर देवस्थान विश्वस्त संतोष गारुडे, युवक कार्यकर्ते बापूराव रोडगे, शुभम सुसे, अरुणराव फुलसौंदर, राजेंद्र पवार, दत्तू तुपे,विद्यालयाचे मुख्याध्यापक फुलारी सर, तुळशीराम तुपे, श्री गायकवाड देवगाव, आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले व नामदार जयकुमार भाऊ गोरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या.


