माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादीचे नेते, आमदार निलेश लंके हे अजित पवार यांची साथ सोडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याची
माहिती समोर आली आहे. या बातमीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. मात्र आता निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशाबाबत खुद्द शरद पवार यांनीच खुलासा केला आहे. ते पुण्यात
आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.निलेश लंके राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात येणार या बातमीला अर्थ नाही, मला त्याबाबत काहीही माहिती नाही. हे मी तुमच्याकडूनच ऐकत असल्याची’
प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. त्यामुळे तुर्तास तरी निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम लागला आहे.आज माध्यमांशी बोलत असताना पत्रकारांनी शरद पवार यांना निलेश लंके
आज शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत अशा चर्चा आहेत असा प्रश्न केला असता त्यांनी “या चर्चांना काही अर्थ नाही” असं म्हटलं आहे. तर “निलेश लंके यांच्या प्रवेशावर माहीती नाही.
लंके पक्षप्रवेश करणार ही चर्चा मी तुमच्याकडून ऐकतोय”, असंही ते पुढे म्हणाले आहेत.दरम्यान लोकनेते लवकर निर्णय घ्या, दक्षिण नगरमध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ‘तुतारी’ वाजवा असं म्हणत
दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांनी शरद पवार गटात परत यावं असं आवाहन केलं होतं. कोल्हेंच्या त्या आवाहनाला आता निलेश लंके यांनी प्रतिसाद दिला आहे.