माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक मोठा भूकंप येणार असल्याचा मोठा दावा काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस गटात फूट पडलेली आहे. या गटात
अजून एक फूट पडणार असल्याचा मोठा दावा अतुल लोंढे यांनी केला आहे. अजित पवार गटातील धनंजय मुंडे, सुनील तटकरे, सुनील शेळके यांच्यासह अनेक बडे नेते भाजपात प्रवेश करु
शकतात आणि उरलेले नेते शरद पवार यांच्याकडे परत येऊ शकतात, असा दावा अतुल लोंढे यांनी केला आहे. भाजप सर्वांना धोका देईल. त्यामुळे अजित पवार एकटे पडू शकतात, असं
अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे. “फुटलेल्या गटात पुन्हा अजून एक फूट पडणार आणि काही लोक भाजपात जाणार, असा दावा अतुल लोंढे यांनी केला आहे. अजित पवार गटातील तब्बल 12 नेते
हे भाजपात प्रवेश करतील”, असा धक्कादाक दावा अतुल लोंढे यांनी केला आहे.अतुल लोंढे नेमकं काय म्हणाले धोके पे धोका…. ऐसा कोई सगा नहीं जिसे भाजपने ठगा नहीं. राष्ट्रवादी काँग्रेस
अजित पवार गटाचे 12 बडे नेते, मंत्री आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीचा दुसरा गट शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील
राष्ट्रवादीत जाणार, सूत्रांची माहिती”, असा दावा अतुल लोंढे यांनी ट्विटरवर केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात आता विविध चर्चांना उधाण आलं आहे.महायुतीत तर जागावाटपावरुन
मित्रपक्षांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरु असल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळातल्या घडामोडींना जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. लोकसभेच्या निवडणुकींनंतर महाराष्ट्रात विधानसभेचीदेखील निवडणूक
असणार आहे. त्यामुळे सध्या घडणाऱ्या घडामोडी जास्त महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्राने दोन वर्षांपूर्वी राजकीय भूकंप पाहिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षात मोठी फूट पडली.
त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही तशीच फूट पडली.या दोन भूकंपाचे पडसाद आतापर्यंत उमटत असताना आता पुन्हा तिसऱ्या भूकंपाचे संकेत अतुल लोंढे यांच्याकडून देण्यात आले आहेत.
अजित पवार गटातले 12 बडे नेते भाजपात जाणार असल्याचा त्यांचा दावा कितपत खरा आहे? हे आगामी काळात स्पष्ट होईलच.