Monday, May 27, 2024

अत्यंत महत्त्वाची बातमी: घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा मग…

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढली आहे. परिणामी राज्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे.

त्यातही विदर्भात (Vidarbha) गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पारा (Vidarbha Heat) सातत्याने वाढत आहे. मंगळवारी विदर्भात वाशिम जिल्ह्याचे सर्वाधिक तापमान 39. 4 अंश सेल्सिअस

नोंदवले गेले. विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे तापमान 35 अंशांच्या पार गेले आहे. वाशिम पाठोपाठ यवतमाळमध्ये तापमान 39.0 अंश सेल्सिअसवर गेले आहे. गेल्या आठवड्यात पुण्यासह

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील किमान तापमान 11 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. तर, कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आसपास होते. त्यामुळे सकाळी उकाडा आणि दुपारी कडक उन्हाचा तडाखा जाणवत आहे.

सोमवारच्या तुलनेत आज मंगळावारी कमाल तापमानात सरासरी ३ ते ४ अंशांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे विदर्भात सर्वात जास्त किमान आणि कमाल तापमानातील वाढ ही एकट्या

वाशिम जिल्ह्यात नोंदवली गेली आहे. वाढत्या उष्णतेची झळा बघता दुपारच्या वेळेत रस्त्यांवरील वाहनांची आणि पादचाऱ्यांची वर्दळ देखील कमी झाल्याचे चित्र आहे. त्याउलट, झाडांखाली गारीगार,

ऊसाचा रस आणि कलिंगड विक्रेत्यांचे प्रमाण वाढले आहे. उत्तरेकडून येणारा थंड हवेचा प्रवाह कमी झाल्यामुळे कमाल-किमान तापमानात वाढ झाली आहे. त्याशिवाय, अरबी समुद्र आणि बंगालच्या

उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्यांमध्ये बाष्पाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे अवकाळी पावसाचे ढगही दिसेणासे झाले आहेत. आगामी काळात तापमानात काही अंशी सातत्याने वाढ होण्याचा अंदाज देखील

व्यक्त केला आहे.सध्या महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात सरासरीपेक्षा जास्त वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यात सर्वाधिक

तापमान वाशिम येथे 39. 4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. तर मध्य महाराष्ट्रातही सोलापूर 39. 2 अंश सेल्सिअस, मालेगाव 38. 4 अंश सेल्सिअस, सांगली 38. 6 अंश सेल्सिअस तापमाना नोंदवले गेले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!