नेवासा/प्रतिनिधी
नेवासाता लुक्यातील तरवडी येथील सत्यशोधक दीनमित्रकारमु कुंदराव पाटील स्मारक समितीचे वतीने देण्यात येणारे २०२५ या वर्षीचे दीनमित्रकार मुकुंदराव पाटील
राज्यस्तरीय पत्रकारीता व साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी दिली.
नेवासा तालुक्यातील तरवडी येथील दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने सत्यशोधक विचारांशी बांधिलकी असणाऱ्या पत्रकारास व साहित्यास दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समिती तरवडी यांच्या वतीने १९९५ पासून दरवर्षी पुरस्कार दिले जातात. मंगळवार दि.२ डिसेंबर २०२५ रोजी स्मारक समितीच्या सभागृहात सन २०२५ च्या पुरस्कारांची घोषणा स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,उपाध्यक्ष कॉ.बाबा आरगडे व सचिव उत्तमराव पाटील यांनी केली ते पुरस्कार असे…
*दीनमित्रकार सत्यशोधक मुकुंदराव
पाटील पत्रकारिता पुरस्कार-२०२५*
विश्वास शामराव पाटील,कोल्हापूर
(उप वृत्त संपादक,लोकमत कोल्हापूर)
*साहित्य पुरस्कार-२०२५*
१)रवींद्र रेखा गुरव,कोल्हापूर(कादंबरी-बे दुणे शून्य)
२)माधव जाधव,नांदेड (कथा-आमचं मत आम्हालाच)
३)धनाजी धोंडीराम घोरपडे,सांगली (कविता-जामिनावर सुटलेला काळा घोडा)
४)गजानन इंदुशंकर देशमुख,अमरावती (चरित्र-सबकु सलाम बोलो)
५)संजय बोरुडे,अहिल्यानगर(ललित गद्य-लोकधन)
६)प्रभाकर गायकवाड,परभणी (वैचारिक-मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण)
७)राजेंद्र सलालकर,अहिल्यानगर(समीक्षा-तीव्र कोमल समीक्षेचे प्रकरण).
*विशेष पुरस्कार:-*
१) सचिन वसंत पाटील,सांगली (मायबोली रंग कथांचे).
ग्रंथनिवड परीक्षक म्हणून प्रा.डॉ.सुधाकर शेलार, प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, डॉ. महेबूब सय्यद यांनी काम पाहिले.


