Sunday, March 29, 2026

बेलापूर-परळी रेल्वे मार्गासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू-आ.विठ्ठलराव लंघे

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

बेलापूर-परळी रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाचे जे काही सहकार्य लागेल त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे पाठपुरावा करू. प्रसंगी विधानसभेत तारांकित प्रश्न ही उपस्थित करू अशी ग्वाही नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी दिली.

नेवासा शेवगाव-गेवराई मार्गे  बेलापूर(श्रीरामपूर) ते परळी रेल्वे मार्गासाठी बेलापूर-परळी रेल्वे कृती समितीच्या वतीने  रितेश विजयकुमार भंडारी,रज्जाक निजामशा इनामदार व सुरेश वसंतराव नरवणे यांनी  सोमवार पासून दि.९ पासून कुकाणा  येथे ग्रामपंचायत स्टेजवर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली,त्यावेळी ते बोलत होते.भाजपा किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव काळे, बाळासाहेब शिरसागर,प्रभाकर खंडागळे,पांडुरंग कावरे आदी यावेळी उपस्थित होते.

आ.लंघे पुढे म्हणाले की, बेलापूर परळी रेल्वे मार्ग केंद्राच्या अखेरतला विषय असला तरी यासाठी राज्य शासनाचे जे जे काही योगदान असेल त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
यांच्याकडे पाठपुरावा करू.

अहिल्यानगर विशेष पोलीस शाखेचे अधिकाऱ्यांनी ही उपोषणकर्त्यांची भेट घेतली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!