अहिल्यानगर/प्रतिनिधी
उसाला ५००० टनाप्रमाणे भाव मिळावा तसेच नगर जिल्हातील साखर कारखानादार यांचे दि.९/११/२०२६ रोजीपर्यत उसाचे भाव जाहीर करावे या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी आहिल्यानगर ते मनमाड रोड राहुरी मार्केट यार्डसमोर रोडवर मंडप टाकुन बेमुदत रस्तारोको आंदोलन सुरू केल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने जिल्हा पोलीस प्रशासनाने आहिल्यानगर ते मनमाड वहातुक मार्गात बदल केला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मुक्कम सुदर्शन यांनी याबाबत जाहीर केलेल्या आदेशात म्हटले आहे की,राहुरी पोलीस स्टेशन हड्डीत श्री. रविंद्र बापुसाहेब मोरे उपाध्यक्ष शेतकरी संघटना (शिवसेना शिंदेगट) व इतर स्वाभीमानी शेतकरी संघटना यांचे वतीने शेतकरी यांचे उसाला ५००० टनाप्रमाणे भाव मिळावा तसेच नगर जिल्हातील साखर कारखानादार यांचे दि.९/११/२०२६ रोजीपर्यत उसाचे भाव जाहीर करावे या मागणीसाठी आहिल्यानगर ते मनमाड रोड राहुरी मार्केटयार्डसमोर रोडवर मंडप टाकुन बेमुदत रस्तारोको आंदोलन सुरू केले आहे. सदर मार्गावरुन लाहान मोठ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतुक होत असल्याने रस्ता रोको आंदोलनामुळे वाहतुक कोंडी तसेच एखादा अपघात होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये. त्या करीता सदर महामार्गावरील वाहतुक पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक आहे. अशी आमची खात्री झाली आहे.
त्या अर्थी, मी मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर मला महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ (१) (ब) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन आदेशात नमुद केल्याप्रमाणे दि. ०९/११/२०२६ रोजीचे १४.०० वा. पसुन अंदोलन स्थगित होई पर्यंत अहिल्यानगर मनमाड या मार्गावरील अवजड वाहतूक व सर्व प्रकारची चारचाकी वाहने खालील पर्यायी मार्गाने वळविणेबाबत आदेश जारी करीत आहे.
१) अहिल्यानगर कडुन, राहुरी शिर्डी, मनमाड, मालेगाव, धुळे कडे जाणारे वहतुकीसाठी पर्यायी मार्ग…
> विळद सर्कल दुधडेरी चौक शेंडी बायपास नेवासा फाटा कायगाव टोके गंगापुर वैजापुर मार्गे इच्छितस्थळी जातील.
२) मनमाड कडुन कोपरगाव, शिर्डी, राहुरी मार्गे अहिल्यानगर कडे येणाऱ्या वहतुकीसाठी पर्यायी मार्ग…
> कोपरगाव – पुणतांबा फाटा वैजापुर मार्गे इच्छित स्थळी जातील व
> (कमी उंचीच्या वाहनांकरीता) कोपरगाव- पुणतांबा / बाभळेश्वर श्रीरामपुर नेवासा मार्गे अहिल्यानगर
३) अहिल्यानगर कडून संगमनेर नाशिक कडे जाणारे सर्व अवजड वहतुकीसाठी पर्यायी मार्ग…
> कल्याण बायपास – आळेफाटा संगमनेर मार्गे इच्छित स्थळी जातील
४)सिन्नर – लोणी मार्गे अहिल्यानगर कडे येणारे अवजड वहतुकी साठी पर्यायी मार्ग….
> संगमने – आळेफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील
सदर आदेश शासकीय वाहने, अॅम्ब्युलन्स, फायरब्रिगेड तसेच स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक कारणास्तव परवानगी दिलेल्या वाहनांना लागु राहणार नाही.
प्रस्तुत आदेश आज दिनांक ०९/११/२०२६ रोजी माझे सही शिक्या निशी दिला आहे.
पोलीस अधिक्षक
(मुम्मका सुदर्शन)
भा.पो.से.
पोलीस अधीक्षक,अहिल्यानगर


