Tuesday, November 10, 2026

जेष्ठ साहित्यिक यशवंतरावजी गडाख यांनी गोड केली ऊसतोडणी कामगारांची दिवाळी

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/राहुल राजळे

सर्वत्र दिवाळीचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा होत असताना साखर कारखान्यांची धुराडी पेटलेली असल्याने ऊस तोडणी कामगार मात्र आपल्या कुटुंबासह ऊसाच्या फडातच दिवाळी साजरी करत असतात. वर्षानुवर्षे दिवाळीच्या सणातही ऊस तोडणीचे कष्टाचे काम करणाऱ्या या कामगारांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण व्हावेत, त्यांच्या कुटुंबीयांनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, या भावनेतून ज्येष्ठ नेते, माजी खासदार तथा ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी यंदाही ऊसतोडणी कामगारांसोबत दिवाळी साजरी करत त्यांचा सण गोड केला.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सोनई परिसरात ऊस तोडणीसाठी आलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांची यशवंतराव गडाख यांनी मळ्यात जाऊन भेट घेतली. यावेळी कामगार कुटुंबातील महिलांना साड्या, लहान मुलांना रोख रक्कम तसेच दिवाळीची मिठाई भेट देण्यात आली. अचानक मिळालेल्या या प्रेमाच्या भेटीने ऊसतोडणी कामगारांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

याप्रसंगी बोलताना माजी खा. यशवंतराव गडाख म्हणाले की, आपण सर्वजण दिवाळीचा सण आनंदाने साजरा करत असताना साखरेसाठी लागणारा ऊस तोडण्यासाठी ऊसतोडणी कामगार मात्र कुटुंबासह शेतात कष्ट करत असतात. त्यांच्या चिमुकल्यांची आणि कुटुंबीयांची दिवाळीही आनंदात साजरी झाली पाहिजे. आपण दिवाळी साजरी करताना या कष्टकरी बांधवांचाही आनंदात सहभाग असावा, ही भावना मनाशी बाळगून दरवर्षी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करतो.

यावेळी सौ शारदाताई गडाख, जिल्हा परिषद अर्थ व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती सुनीलराव गडाख, मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख, नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीताताई गडाख, उषाताई गडाख, जयश्रीताई गडाख आदी उपस्थित होते.

*परंपरा जपली…

गेले अनेक वर्षापासूनची।ऊस तोड कामगारांसह सोनई येथील मळ्यात दिवाळी साजरी करण्याची परंपरा माजी खा. यशवंतराव गडाख व कुटूंबातील सदस्यांनी जपली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!