संगमनेर/प्रतिनिधी
संगमनेर येथील आशीर्वाद नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी श्री अरुण ताजणे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.स्व अशोकराव गोरे साहेब मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ.सुदर्शन गोरे म्हणाले की, आशीर्वाद नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड होणे ही श्री अरुण ताजणे यांची पतसंस्थे प्रती असलेल्या समर्पण व निष्ठेची पावती आहे.
श्री.अरुण ताजणे म्हणाले की, आशीर्वाद नागरी सहकारी पतसंस्थेची मागील ३५ वर्षापासून यशस्वीरित्या वाटचाल सुरु आहे. पतसंस्थेमार्फत माहेरचा आशीर्वाद, कन्यादान निधी, सभासदांच्या पाल्यांसाठी वह्या वाटप ,वैद्यकीय मदत, अंशदान, सभासद व कर्मचारी विमा असे समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येतात , पतसंस्थेची अशीच वाटचाल भविष्यात देखील चालू राहील असे सांगितले.
डॉ.सुदर्शन गोरे, डॉ.केतन गोरे ,डॉ. चैताली गोरे ,श्री.गाडेकर, डॉ.तांबे, श्री सटाले आदी यावेळी उपस्थित होते


