Sunday, March 29, 2026

अहील्यानगर जिल्ह्यात गांव तेथे लोक क्रांती सेनेची स्थापना करणार-नगरसेवक शशिकांत लोळगे

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/प्रतिनिधी

राहाता शहरात प्रभागात विकासाची कामे करत असतांना, शहरातील नागरीकांच्या अडीअडचणी सोडवून अहिल्यानगर जिल्ह्यात गांव तेथे लोक क्रांती सेनेची स्थापना करणार असल्याचे राहता नगरपरीषदेचे लोक क्रांती सेना पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक शशिकांत लोळगे यांनी लोक क्रांती सेना पक्षप्रमुख श्री.देवेंद्र पाटील यांना अश्वासीत केले.

राहता नगरपरीषदेचे लोक क्रांती सेना पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक शशिकांत लोळगे यांचा पक्षप्रमुख श्री.देवेंद्र पाटील यांनी सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी लोक क्रांती सेनेचे जेष्ठ मार्गदर्शक श्री.विजय राऊत,लोक क्रांती उद्योजक सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्री.गुलाबराव माळी,लोक क्रांती सेनेचे उपनेते श्री.बाळासाहेब आंबेकर हे यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगरसेवक शशिकांत लोळगे म्हणाले की, विकासाच्या मुद्द्यावर आपण नगरपरिषद प्रशासनाला योग्य ते सहकार्य करु.दिलेली आश्वासने पूर्ण करत असतांना विकला जाणार नाही,वाकणकर नाही, बेशिस्त वागणाऱ्यांना शिस्त लावल्याशिवाय राहणार नाही.आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत लोक क्रांती सेना पक्ष आपला सक्रिय सहभाग नोंदवेल असा ठाम विश्वास व्यक्त केला.जिल्हा परिषद निवडणूकी संदर्भात लोक क्रांती सेना पक्ष ईच्छुक उमेदवारांची लवकरच बैठक बोलावणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!