नेवासा/प्रतिनिधी
मुळा सहकारी साखर कारखान्याच्या वर्ष २०२६-२७ च्या ४९ व्या ऊस गळीत हंगामासाठी बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ कारखान्याचे अध्यक्ष भाऊसाहेब मोटे व उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
प्रारंभी कारखान्याचे संचालक भाऊसाहेब हरिभाऊ भालके व सौ.शुभांगी भाऊसाहेब भालके तसेच संचालक त्रिंबक काशिनाथ सुकाळकर व सौ.मुक्ताबाई त्रिंबक सुकाळकर यांच्या शुभहस्ते बॉयलरचा विधिवत पूजाविधि करण्यात आला.
याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष भाऊसाहेब मोटे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना हंगामाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच हंगामात गळीतात व्यत्यय येणार नाही यासाठी सर्वांनीच काळजी घ्यावी आणि चांगला साखर उतारा मिळवण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले. कारखान्याचे साखर युनिट, वीज प्रकल्प व इथेनॉल प्रकल्प चांगल्या प्रकारे चालवून उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यावर भर द्यावा असे आवाहन कर्मचाऱ्यांना केले. तसेच गळीत हंगाम सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी ऊसतोड वाहतूक यंत्रणा वेळेत हजर होईल यादृष्टीने शेती खात्याने काळजी घ्यावी अशा सूचना केल्या.
याप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.
कार्यक्रमाला कारखान्याचे संचालक सर्वश्री.दिनकर अंबादास घावटे, लक्ष्मण तुळशीराम पांढरे, एकनाथ मारुती जगताप, दत्तात्रय भानुदास बऱ्हाटे, बापूसाहेब शंकर शेटे, सोपान विठ्ठल विरकर, ज्ञानेश्वर रामराव दरंदले, चंद्रकांत भानुदास टेमक, बाळासाहेब पुंजाजी भणगे, त्रिंबक काशिनाथ सुकाळकर, पांडुरंग श्रीरंग निपुंगे भाऊसाहेब हरिभाऊ भालके, शंकर पंढरीनाथ कदम, बाळासाहेब भाऊलाल परदेशी, सौ.छाया भास्कर भुसारी तसेच कारखान्याचे अधिकारी व्ही.के.भोर, रितेश टेमक, टी.आर.राऊत, एस.ए.देशमुख, योगेश घावटे, संजय टेमक, विजय फाटके, एस.डी.पवार, डी.बी.नवले, एस.डी.देशमुख आणि कर्मचारी युनियनचे पदाधिकारी दत्तात्रय निमसे व अशोकराव पवार उपस्थित होते.


