अहिल्यानगर
जिल्ह्याच्या राजकारणाचे आणि सहकार क्षेत्राचे केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया आज गुरुवार दि. १२ रोजी बिनविरोध पार पडली. बँकेच्या अध्यक्षपदी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील तर उपाध्यक्षपदी संगमनेर येथील रणजीत देशमुख यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केली. निवडीनंतर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत स्वागत केले.


