Wednesday, February 11, 2026

ताईसाहेब कदम व शारदाताई फौंडेशनचे “सावित्रीची लेक” गौरव पुरस्कार जाहिर

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील सोनई येथीलनश्रीमती ताईसाहेब कदम सेवाभावी फौंडेशन अण्ड रिसर्च सेंटर व शारदाताई फौंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने “स्व.ताईसाहेब कदम स्मृतीदिन” १२ जानेवारी २०२६ निमित्त देण्यात येणारे “सावित्रीची लेक” गौरव पुरस्कार जाहिर झाले असून कुकाणा येथील सौ.नर्मदाताई पांडूरंग अभंग,देवगांव येथील सौ.दुर्गाताई रमेश लिंगायत, घोडेगाव येथील सौ.शोभाताई सुदामराव तागड,
चांदा येथील सौ.पार्वतीताई कारभारी जावळे,सौ. शर्मिलाताई बाळासाहेब शिंदे व सौ.प्रतिभाताई राजेंद्र चौधरी
यांचा समावेश आहे.
स्व.ताईसाहेब कदम स्मृतीदिनी दि. १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता सोनई येथे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे सेमिनार हॉल।मध्ये सदर पुरस्कार वितरण व
गरजु निराधार विधवा महिलांना आर्थिक मदत वाटप करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा
सौ. राजश्रीताई घुले,नेवासा पंचायत समितीच्या नमाजी सभापती सौ. सुनिताताई गडाख,
श्री. निलेश जोशी,श्री. कारभारी जावळे,सौ. उषाताई गडाख,सौ. जयाताई गडाख,श्री. सुनिल दरदंले,
श्री. बाळासाहेब पाटील,डॉ.गोरक्षनाथ कल्हापूरे,सौ.आशाताई कर्डिले, सौ.सरोजताई गडाख,विजय खंडागळे
यांचे प्रमुख उपस्थितित होणार आहे.

सहाय्यक राज्यकर आयुक्त पदी नियुक्ति बद्दल कु.पुजा शिवाजीराव शिंदे व पत्रकारीता समाज सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री.विनायकराव दरंदले यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!