Sunday, March 29, 2026

तिर्थक्षेत्र शिनाई जागृत देवस्थान यात्रा महोत्सवाची संतपुजन व काल्याची दहीहंडी फोडुन सांगता

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:अहिल्यानगर जिल्ह्यातील भानसहिवरे येथील अतिशय प्राचीन असलेले तिर्थक्षेत्र शिनाई जागृत देवस्थान चा जिल्हास्तरीय यात्रा महोत्सव व अखंड नारळी सप्ताह व भव्य दिव्य अविस्मरणीय श्रीमद् भागवत कथा सोहळा श्री श्री 108 महंत गुरुवर्य दिगंबर बाबाजी आराध्य व महंत गुरुवर्य भास्कगीरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने व उत्तराधिकारी ज्योतिषाचार्य बालब्रम्हचारी महंत आवेराज महाराज यांच्या मार्गदर्शनाने सुरु झालेल्या दि.01 जानेवारी 2025 पासून सुरू झालेला या कार्यक्रमाची सांगता सायंकाळी 6 ते 9 या वेळेत ह.भ.प. महंत रामेश्वर महाराज राऊत शास्त्री (राजेगाव,घोडेगाव) यांच्या काल्याची किर्तनाने दहीहंडी दोन क्रेनच्या सहाय्याने 100 फुट उंचीवर श्री श्री 108 महंत गुरुवर्य बाबाजी, महंत आवेराज महाराज, महंत रामेश्वर महाराज राऊत यांच्या हस्ते दहिहंडी फोडण्यात आली .

या प्रसंगी श्री श्री 108 महंत गुरुवर्य बाबाजी यांचा भव्य दिव्य स्वरूपात संतपुजन सोहळा पार पडला त्या प्रसंगी आठ दिवसा मध्ये महंत भास्करगीरीजी महाराज, देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी स्वामी महंत प्रकाशनंदगीरीजी महाराज, महंत परांडेकर बाबाजी, महंत सुनिलगीरी महाराज, महंत रमेशानंदगीरी महाराज, महंत सुधाकर बाबा येळमकर, महंत गणेशानंद महाराज, महंत गोपाल गीरी महाराज, महंत ऋषीनाथ महाराज, महंत तुषार बाबाजी, महंत किशोर बाबाजी, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज हजारे, ह.भ.प. लक्ष्मी नारायण महाराज, ह.भ.प. गणेश महाराज गायकवाड,

खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेब, माजीमंत्री शंकरराव गडाख, आमदार विठ्ठलराव लंघे , सुनिल गडाख , युवानेते उदयन गडाख, सुरेश बेल्हेकर, शिवाजी पाठक,पांडुरंग उभेदळ, सिद्धांत नवले, प्रताप चिंधे, कल्याणराव उभेदळ, भिवाजीराव आघाव, किशोर गारुळे, दिपक अकोलकर, राममामा सुरोशे, अमृत उभेदळ, ज्ञानेश्वर औताडे, किशोर सुकाळकर, पत्रकार सुधीर चव्हाण, आत्माराम घोरपडे,पत्रकार सुनिल गर्जे, होमगार्ड बाळासाहेब देवखीळे हे उपस्थित होते काल्याचा महाप्रसाद नेवासा पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर जोजार यांच्या वतीने देण्यात आला .

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!