Wednesday, February 11, 2026

सौंदाळा ग्रामसभेत रक्तदान करून “जातमुक्त” गावाची घोषणा

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावातील नागरिकांनी जाती भेदभाव या गोष्टीला मुठमाती देऊन स्वातंत्र्य समता बंधुता अंगीकारण्यासाठी सौंदाळा ग्रामसभेत रक्तदान करून आवाहनास प्रतिसाद देऊन “जातमुक्त गाव” घोषित केले असल्याची माहिती लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी दिली.

देशात आणि महाराष्ट्रात जाती जाती मध्ये माणसं विखुरलेली असल्यामुळे गावोगावी जाती-जाती मधले होणारे ताण तणाव, शांतता भंग आणि विनाकारण जातीयते मुळे होणारे तणाव कमी व्हावे आणि मानव अधिकारांचे उल्लंघन होऊ नये हा सदर ठराव घेण्याचा मुख्य हेतू आहे.

भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना समानता, स्वातंत्र्य, बंधुता व मानवी प्रतिष्ठेचा मूलभूत अधिकार प्रदान केला आहे. तरीही समाजात जातीय भेदभाव, अस्पृश्यता व सामाजिक विषमता आढळून येते.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1958 अंतर्गत ग्रामसभेला गावाच्या सामाजिक, शैक्षणिक व नैतिक विकासासंबंधी तसेच सार्वजनिक हिताच्या विषयांवर ठराव करण्याचा अधिकार आहे. त्या अधिकाराचा वापर करून ग्रामपातळीवर सामाजिक एकात्मता व समता प्रस्थापित करण्यासाठी आपले गाव “जातमुक्त गाव” म्हणून घोषित करणे अत्यंत आवश्यक आहे असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

सदर संकल्पना व प्रेरणा सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रमोद झिंजाडे यांच्या मार्गदर्शनातून प्राप्त झाली असून ग्रामसभा त्यांचे विशेष आभार व्यक्त केले.
वरील ठराव सुचना सरपंच शरद आरगडे यांनी मांडला व अनुमोदन श्री बाबासाहेब बोधक यांनी दिले ठराव सर्वानुमते एकमताने मंजूर करण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायत अधिकारी प्रतिभा पिसोटे, उपसरपंच भिवसेन गरड, गणेश आरगडे, हरिभाऊ आरगडे.
,बाळासाहेब बोधक,बाबासाहेब बोधक, अमीनभाई सय्यद, छगन सय्यद,सचिन अरगडे, कृष्णा चामुटे, गणेश महाराज आरगडे, हरीश बोधक, बाबासाहेब आरगडे,भारत तारकस,सोमनाथ आरगडे,बाळासाहेब आरगडे,श्रद्धा आरगडे,राणी आरगडे, मनीषा गरड, नंदा आढागळे,कावेरी आढागळे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!