Wednesday, June 24, 2026

ज्ञानेश कमानदार यांची तालुका कृषी अधिकारी पदी निवड

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील बाभूळखेडा येथील रहीवाशी व सध्या सातारा जिल्हा परिषेदेत ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश बद्रीनाथ कमानदार यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत राज्यात ४८ व्या रँकने तालुका कृषी अधिकारी पदी निवड झाली.

ज्ञानेश कमानदार यांचे बाभूळखेडा येथे पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षण,जळका येथील गुरुदास भास्करगिरी महाराज विद‌यालयात ५ वी ते १० वी माध्यमिक शिक्षण,११ वी १२वी लोणी येथील पद्मश्री विखे पाटील पब्लिक स्कूल मध्ये तर सोनई कृषी महाविद्यालयात कृषी पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले आहे.
सन २०२५ मध्ये त्यांची ग्रामपंचायत अधिकारी पदी निवड झाल्याने ते सध्या सातारा जिल्हा परिषेदेत कार्यरत आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या कृषी विभागाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यामध्ये ज्ञानेश हा पहिल्याच प्रयत्नात राज्यात ४८ व्या रँकने उत्तीर्ण झाला आहे.

ज्ञानेश हे नेवासा तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष व भेंडा गावचे माजी ग्राम महसूल अधिकारी बद्रीनाथ नारायण कमानदार यांचे चिरंजीव आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!