नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील मोरयाचिंचोरे येथील जागृत पोहीचा महादेव येथे दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. महाशिवरात्री निमित्त।राम महाराज खरवंडीकर यांचे कीर्तन संपन्न झाले.माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नातुन।पूर्णत्वास आलेल्या सभामंडपाचे उपस्थित भाविकांच्या उपस्थित लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना माजी मंत्री शंकरराव गडाख म्हणाले की, गेल्या २५ वर्षांपासून पोहीचा महादेव मंदिरात मित्रपरिवारासह येत असतो. येथे आल्याने मनाला ऊर्जा मिळते
मोरयाचिंचोरे, चेडगाव,वंजारवाडी, धनगरवाडी,ब्राम्हणी,सोनई,लोहोगाव व परिसरातील ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन मंदिराच्या विकासासाठी हातभार लावला.मनोभावे दर्शनासाठी येणारे भाविक पाहून मोठा आनंद वाटतो
मंदिरासाठी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सभामंडप दिला.या सभामंडपात हा आजचा कार्यक्रम झाला.यामुळे भाविकांची गैरसोय दूर झाली.धार्मिक कार्याच्या निमित्ताने गावाचा परिसराचा एकोपा जपला
जावा.मोरयाचिंचोरे व परिसराच्या विकासासाठी सत्ता असो व नसो सदैव प्रयत्नशील राहील असे माजी मंत्री शंकरराव गडाख म्हणाले.
ग्रामस्थांच्या वतीने गणेश शिकारे यांनी मनोगत व्यक्त करून पोहीचा महादेव मंदिरासाठी निधी दिल्याबद्दल माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे आभार मानले.
माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या वतीने भाविकांना दिवसभर फराळ वाटप करण्यात आले.महाशिवरात्री निमित्त माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी त्रीलिंगी महादेव मंदिर सोनई,त्रिवेनीश्वर महादेव मंदिर
हंडीनिमगाव,नर्मदेश्वर महादेव मंदिर येथे भेटी दिल्या.सोनई त्रीलिंगी महादेव मंदिर येथेही तरुण मंडळांनी खिचडी वाटप केली.


