Wednesday, April 15, 2026

नगर आकाशवाणी केंद्राकडून प्रसाद खराडे यांचा सन्मान

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-02 at 7.54.58 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/प्रतिनिधी

कुकाणा येथील प्रगतशील शेतकरी प्रसाद श्रीरंग खराडे यांचा अहिल्यानगर आकाशवाणी केंद्राकडून रेडिओ किसान दिवसानिमित्ताने सन्मान करण्यात आला.

रविवार दि.१५ फेब्रुवारी रोजी आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रात रेडिओ किसान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्रसाद खराडे यांचेसह जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण, उल्लेखनीय काम करणारे, प्रगतिशील नव्वद शेतकऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. आकाशवाणी आणि शेतकरी बांधवांचे नाते हे अधिक वृद्धिंगत होण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला अहिल्यानगरचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उपायुक्त डॉ.उमेश पाटील, जिल्हा परिषद अहिल्यानगरचे कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सचिन सदाफळ, अहिल्यानगरचे उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे, दहिगाव-ने कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. शामसुंदर कौशिक, एनडीडीबी डेअरी सर्व्हिसेस-राहुरी सिमेन्स स्टेशनचे महाव्यवस्थापक डॉ. सरोज वहाने,  एनडीडीबी डेअरी सर्व्हिसेस-राहुरी सिमेन्स स्टेशनचे महाव्यवस्थापक डॉ. सरोज वहाने, ‘सकाळ’चे सहसंपादक प्रकाश पाटील, ‘लोकमत’चे निवासी संपादक सुधीर लंके, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कार्यक्रम प्रमुख सुदाम बटुळे उपस्थित होते.

वरिष्ठ अभियांत्रिकी सहायक गजेंद्र पवार, वरिष्ठ तंत्रज्ञ संतोष साबळे, पांडुरंग जोशी, जयंत लाटे, संतोष मते, सोमनाथ कांडके, अंकुश जोशी, रेखा शेटे, शीतल ठोंबरे, अक्षता अन्नदाते, गौरव बने, ज्ञानेश्वर राऊत, रवींद्र दातीर, किरण जाधव, विष्णू रच्चा यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

*सन्मानार्थी शेतकरी…

प्रसाद खराडे,बाळासाहेब गुंजाळ, सुप्रिया नवले, राजेंद्र भवर, सुधाकर जावळे, नाथा देशमुख, विश्वनाथ चव्हाण, विष्णू जरे, डॉ.दत्तात्रय वणे, सूर्यकांत नेटके, नीलेश चिपाडे, गोवर्धन खेडकर, रमाकांत डेरे, संजय राऊत, घनश्याम आढाव, राजेंद्र गलांडे, योगेश वाकचौरे, संदीप कासार, विकास चावरे, प्रकाश जोशी, गंगाधर औताडे, प्रवीण बनकर, इक्बाल सय्यद, रवींद्र कुंकूलोळ, ज्ञानेश्वर लांडगे, सुनील अलभर, रामदास कोरडे, विठ्ठलदास आसावा, प्रसाद पवार, संतोष दरेकर, कल्याणी मुरदारे, दत्तात्रय शेरकर, संकेत बटुळे, संदीप पुराणिक, सर्जेराव मरकड, आशितोष धोंडे, अशोक बकोरे, कैलास शिंदे, अनिल देशमुख, राणी जगताप, वैशाली शेळके, योगेश लांडगे, नागेश कदम, संदीप गुंजाळ, अनिल देशपांडे, शैलेश गाडेकर, हनुमंत उबाळे, संदीप कर्डिले, काशिनाथ खरमाळे, संचित गिरमे, बाळासाहेब कंक.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!