मुंबई
राज्यात विविध ठिकाणी प्राचीन महानुभवीय तीर्थक्षेत्र आहेत. या तीर्थक्षेत्रांची माहिती संकलित करुन अधिकार अभिलेखामध्ये त्यांच्या नोंदी घेण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
महानुभाव स्थान महात्म्य अभियान, नागपूरचे समन्वयक हरिहर पांडे यांनी शासनास केलेल्या विनंतीनुसार महानुभाव तीर्थस्थानांबाबतची माहिती विहित विवरणपत्रात शासनास सादर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले होते. या अनुषंगाने महसूल मंत्री बावनकुळे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला.


