Thursday, April 30, 2026

ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पायी पालखी सोहळा पूर्वनियोजन बैठक संपन्न

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-17 at 6.17.27 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा येथील श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे वतीने आषाढ़ी एकादशी निमित्त आयोजित करण्यात येत असलेल्या ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पायी पालखी सोहळा २०२६ या ऐतिहासिक सोहळ्याच्या नियोजनासाठी आज दि. १३ मार्च २०२६ शुक्रवार रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे पूर्वनियोजन बैठक उत्साहात संपन्न झाली.

श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे महंत वेदांताचार्य ह.भ.प.देवीदास महाराज म्हस्के बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.गंगापूर येथील विठ्ठल आश्रमाचे प्रमुख ह.भ.प. रामभाऊ महाराज राऊत,सुदामदेव महाराज आदमाने, राजाराम महाराज तूवर, प्रवीण महाराज कोरडगावकर, श्रीराम महाराज झुंजुर्के, आदिनाथ महाराज भोगे, नंदकिशोर महाराज खरात, श्रीहरी महाराज वाघचौरे, श्रीराम महाराज चोपडे,श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष माजी आ.पांडुरंग अभंग, खजिनदार ज्ञानोबा माऊली शिंदे, विश्वस्त कैलास जाधव, कृष्णा पिसोटे, वारकरी, दिंडी चालक-मालक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पायी पालखी सोहळा २०२६ हा सोहळा श्रीक्षेत्र नेवासा ते श्रीक्षेत्र पंढरपूर दरम्यान पार पडणार असून त्यासाठी दिंडी व्यवस्थापन, वारकऱ्यांची सोय, निवास, भोजन, सुरक्षा व इतर आवश्यक नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.हा पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!