Wednesday, May 13, 2026

‘आनंदवन पसायदान’ संस्था चांगले काम करणाऱ्यांचे नेहमीच कौतुक करते-उध्दवजी महाराज मंडलिक 

IMG-20260511-WA0029
IMG-20260511-WA0029
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

आनंदवन सेवाभावीचे सदस्य हे सेवाभावी वृत्तीने आणि स्वच्छ अंतकरणाने काम करत इतरांच्या गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक कार्य करत असून चांगले काम करणाऱ्यांचे नेहमीच कौतुक करते असे प्रतिपादन सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उध्दव महाराज मंडलिक (नेवासेकर) यांनी केले.

नेवासा तालुक्यतातील सोनई येथील पसायदान आनंदवन सेवाभावी संस्थेच्या चतुर्थ वर्धापनदिनानिमित्त पसायदान पुरस्कार व पत्रकार रत्न पुरस्कारासह गुणगौरव केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान महंत उध्दव महाराज मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.सौ.सुनिताताई गडाख,ओमशांतीच्या उषादिदि, संत निरंकारीचे विठ्ठल महाराज खाडे, ‘एसएसवाय’ च्या डाॅ. हेमा वैरागर, शिवाजी बाफना, डाॅ.गोरक्षनाथ कल्हापुरे,डाॅ. बाबासाहेब शिरसाठ, सुनील दरंदले, मारुती मित्र मंडळाचे सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भ प पंढरीनाथ महाराज तांदळे, साई आदर्श पतसंस्थेचे संस्थापक शिवाजीराव कपाळे, डॉ.संजय सोनवणे यांना पसायदान पुरस्कार देण्यात आला. आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यात विशेष योगदान दिलेल्या श्रीरामपूर येथील प्रकाश बडजाते यांचा कार्यकर्तृत्व सन्मान करण्यात आला.जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष स्व. सोपानराव दरंदले पत्रकार रत्न पुरस्कार सूर्यकांत नेटके यांना देण्यात आला. डॉक्टर देवयानी रवींद्र ससाणे, ओंकार नितीन दरंदले, प्रसाद महाराज तरवडे यांचा गुणगौरव करण्यात आला.डॉ. तुषार दराडे यांनी आभार मानले.

मंडलिक महाराज पुढे म्हणाले की, पसायदान आनंदवन संस्थेने हा पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला असून इतरांच्या गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्यामध्ये सद्गुण असावे लागतात त्याचप्रमाणे संस्थेचे सदस्यांना सर्वांमध्ये सद्गुणच दिसतात यांचे कौतुक करण्यासाठी अनेक जण येतात विद्यार्थ्यांना सायकल वाटप,गरजूंना दिवाळी फराळ, मुलींचे शैक्षणिक पालकत्व, आयोग्य सुविधा, पूरग्रस्तांना मदत, स्वच्छता अभियान व वृक्षारोपण असे उपक्रम सातत्याने करीत असतात.आनंदवन संस्थेने या सामाजिक कार्याला शिखर स्थानी पोहोचवल्याचं त्यांनी सांगितले.

सुनीताताई गडाख…

महिला बचत गटाच्या मार्गदर्शिका सुनीताताई गडाख यांनी सांगितले की, आनंदवन संस्था दोन्ही हाताने दान करत असल्याचे सांगितले.

हभप तांदळे महाराज..

पुरस्कार मूर्ती हभप तांदळे महाराजांनी सांगितले की, हा पुरस्कार परमपूज्य माधवबाबा लांडेवाडीकर यांच्या आध्यात्मिक योगदानाचा व त्यांच्या भक्तांचा पुरस्कार असल्याचे सांगितले.

शिवाजीराव कपाळे…
शिवाजीराव कपाळे यांनी आदर्श पतसंस्थेच्या माध्यमातून सामाजिक धार्मिक कार्य करत असून सभासदांच्या हित जोपासण्याला प्राधान्य दिले जात असून साई आदर्श परिवाराच्या वतीने शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिकपणे काम करत असल्याचे सांगितले.

डॉ.संजय सोनवणे…
डॉ.संजय सोनवणे सांगितले की जागतिक दर्जाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत पण ज्ञानदेवांच्या कर्मभूमीत कार्य करत असताना आनंदवन संस्थेच्या माध्यमातून हा पुरस्कार वडिलांच्या पुण्याईने मिळाल्याचे सांगितले.

सूर्यकांत नेटके…

सूर्यकांत नेटके यांनी सांगितले की तीस वर्षापूर्वी सोनई येथील मुळा साखर कारखान्याची वडीलांनी ऊस तोडणी केली आहे. ज्या ठिकाणी वडील व मी घाम गाळला त्याच भूमीत सत्कार होतोय याचा मोठा आनंद असल्याचे सांगितले.

संस्थेचे सचिव संजय गर्जे यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या उपक्रमांची माहिती देत समाजासाठी कार्य करणाऱ्यांना दिला जाणारा पसायदान पुरस्कार ही एक श्रद्धा असल्याचे सांगितले. आंनदवन पसायदान संस्थेचे अध्यक्ष उदय पालवे, उपाध्यक्ष विनायक दरंदले, किशोर घावटे, अरुण घावटे व सदस्यांनी मान्यवरांचा सत्कार केला.

वाढदिवसानिमित्त सत्संग..

आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर व जेष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त भजन संध्या, ध्यान,ज्ञान व सत्संग कार्यक्रम उत्साहात झाला. यानिमित्त आनंदवन संस्थेने विद्यार्थ्यांना प्रेरणादायक पुस्तकांचे वाटप केले.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!