Friday, May 22, 2026

कर्तव्य समजून केलेली सेवा ईश्वराची सेवा ठरते-गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा/नेवासा

प्रत्येक व्यक्ती समाजाचा देणे लागतो,म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्म कर्तव्य समजून करा. कर्तव्य समजून जगाची  सेवा केली तर ती ईश्वराची सेवा ठरते असे प्रतिपादन  गंगापूर येथील श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेचे  प्रमुख महंत गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत यांनी केले.

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे श्रीसंत नागेबाबा भक्त निवासाचे प्रांगणात नागेबाबा परिवार, नागेबाबा देवस्थान व ग्रामस्थांचे वतीने आयोजित केलेल्या पसायदान चिंतन सोहळ्यात गुरूवार दि.२१ मे रोजी पाचव्या दिवसाचे पसायदान निरूपण करतांना गाथामूर्ती राऊत महाराज बोलत होते.
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं।
भजिजो आदिपुरुखीं । अखंडित
पसायदानातील या ओव्याचे निरूपण करतांना गाथामूर्ती राऊत महाराज यांनी, चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन  म्हणजे चंद्रावर जसे काळे डाग (कलंक) असतात आणि सूर्याची (मार्तंड) उष्णता दाहक असते; तसे संत नसतात. संत हे डाग विरहित (कलंकमुक्त) चंद्रासारखे निष्कलंक आणि शीतल असतात तसेच, त्यांच्या ज्ञानाचे तेज हे सूर्यासारखे असले, तरी ते ताप (उष्णता/अहंकार) देणारे नसून अत्यंत शांत व सुखदायक असते.  ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु  याचा अर्थ असे निष्कलंक आणि शीतल स्वभावाचे संत-सज्जन या जगातील सर्व प्राणिमात्रांचे सोयरे (आत्मीय नातेवाईक) होवोत, अशी माऊली परमेश्वराकडे प्रार्थना करतात.
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं  याचा अर्थ स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांमध्ये  राहणारे सर्व सजीव सर्वार्थाने सुखी आणि परिपूर्ण होवोत. भजिजो आदिपुरुखीं । अखंडित म्हणजे सर्व प्राणिमात्रांनी त्या मूळ ईश्वराची (आदिपुरुषाची) अखंडितपणे भक्ती करावी असा साधा सरळ अर्थ विषद केला.
ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली पसायदानातील मागणी पूर्ण होण्याचा आशीर्वाद निवृत्तीनाथांनी दिलेला आहे.
मात्र सध्याची परिस्थिती पाहता दोन देश एकमेकांसमोर उभे राहिले तर त्याचा परिणाम संपूर्ण  जगाला भोगावा लागतो. मग अशा परिस्थितीत “जो जें वांछील तो तें लाहो। प्राणिजात”  ही ज्ञानेश्वरांची मागणी कशी पूर्ण होणार अशी शंका उपस्थित होते. परंतु ज्ञानेश्वराची ही प्रार्थना-मागणी सीमित नाही,ती अमर्यादित  असल्याने ती पूर्ण होण्यासाठी कालावधी ही मोठा लागणार आहे.
संत-सज्जन हे चंद्रा सारखे आल्हाददायक  आणि सूर्यासारखे अंध:कार दूर करणारे,ताप नष्ट करणारे असतात. आदि पुरुष म्हणजे ज्याने जगात जग  निर्माण केले तो. विश्वाचे चलन करणारा दिसतो पण निर्माण करणारा परमात्मा दिसत नाही. जीवनात सुखाच्या बाबत परिपूर्ण व्हायचे असेल तर आदि पुरुषाचे अखंड भजन केल्यास जीव सुखाने परिपूर्ण होतो.
 प्रत्येक व्यक्ती समाजाचा देणे लागतो,म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्म कर्तव्य समजून करा. कर्तव्य समजून जगाची  सेवा केली तर ती ईश्वराची सेवा ठरते.
लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व ज्ञानेश्वर उद्योग समूहाच्या वतीने उपस्थित भाविकांना महाप्रसादाची पंगत देण्यात आली. 
वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के, राम महाराज झिंजुर्के, ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे प्रमुख माजी आ. नरेंद्र घुले पाटील,आमदार विठ्ठलराव लंघे पाटील,माजी आ.पांडुरंग अभंग, माजी आ.बाळासाहेब मुरकुटे, काशिनाथ नवले,नागेबाबा परिवाराचे प्रमुख कडूभाऊ काळे, अशोकराव मिसाळ, शिवाजी कोलते,कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, रवींद्र मोटे,
एम.एस.मुरकुटे, एस.डी. चौधरी, कल्याणराव म्हस्के,विलास लोखंडे,  अंकुश महाराज कादे, गणेशानंद महाराज, गहिनीनाथ महाराज,दत्ता महाराज झाडे, महेश महाराज मडके, अशोक महाराज कचरे, हरे राम महाराज गाडे,गणेश महाराज आरगडे,गणेश महाराज चौधरी, दत्तात्रय काळे, गणेश गव्हाणे,सकाहरी सोनवणे, अशोक वायकर,नंदू गव्हाणे,भाऊराव मुळे, रामदास आढागळे,
यांचेसह नागेबाबा मंदिराचे विश्वस्त, नागेबाबा परिवाराचे सदस्य, ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते.
*श्री.ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे…
मागील वर्षापासून नेवासा येथून श्रीक्षेत्र नेवासा ते श्रीक्षेत्र पंढरपूर ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा 
सुरू केलेला आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी सोहळा महाराष्ट्र मध्ये भजननिष्ठ आणि शिस्तबद्ध सोहळा म्हणून खूप मोठी ख्याती  झाली. आणि हा सोहळा वृद्धिंगत होण्यासाठी विशेष करून नेवासा तालुक्यातील सर्व वारकरी बांधवांची फार मोठी जबाबदारी आहे. त्याकरता प्रत्येकाने आपापल्या परीने सोहळ्याला सहकार्य केले पाहिजे. हा सोहळा आणखी भव्य दिव्य होण्यासाठी शासनाने या पालखी सोहळ्याची पंढरपूर पालखी सोहळ्यात नोंद घेतली. त्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान श्रीक्षेत्र नेवासा, नेवासा शहर आणि  सर्व वारकरी बांधव  त्याचबरोबर नेवासा व शेवगावचे दोन्ही लोकप्रतिनिधी तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र शासन या सर्वांचे सहकार्य लाभले आहे.
– गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत
- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!