Friday, July 10, 2026

शिक्षक सहकारी बँकेचे कर्मचारी बाबासाहेब कदम यांचा सेवापूर्ती सत्कार

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्हा शिक्षक सहकारी बँकेच्या नेवासा शाखेतील कर्मचारी बाबासाहेब वसंतराव कदम
हे ३८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा देवगाव येथे सेवापूर्ती सत्कार करण्यात आला.

नेवासा तालुक्यातील देवगाव येथे झालेल्या सेवापूर्ती कार्यक्रम सोहळयात सत्कार मूर्ती बाबासाहेब कदम व सौ.शुभांगी कदम यांचा शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्या हस्ते व माजी चेअरमन संतोषराव दुशिंगे,शिक्षक बॅंकेचे संचालक रामेश्वर चोपडे,माजी चेअरमन पांडुरंग काळे,बँकेचे मुख्य कार्यकारी जगताप,सुनील जाधव, माजी चेअरमन शिरसाठ,विठ्ठल काळे, कैलास निकम, म्हस्के सर,ठोकळ सर यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवापूर्ती गौरव करण्यात आला.
या सेवापूर्ती कार्यक्रमाला नेवासा तालुक्यातील शिक्षक बँकेचे सभासद, शिक्षक बांधव तसेच अहिल्यानगर जिल्हयातील सर्व नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!