Thursday, October 22, 2026

जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी सौ.राजश्रीताई घुले यांच्या बिनविरोध निवडीने ‘ज्ञानेश्वर’च्या कार्यक्षेत्रात जल्लोष

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

शेवगाव तालुका सेवा सोसायटी मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील यांची अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली. त्यांच्या बिनरोध निवडीने ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जल्लोष साजरा करण्यात आला.

महाराष्ट्रात पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अहमदनगर येथे स्थापन झाली. लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनी प्रवर्तक म्हणून बँक नोंदणीचा प्रस्ताव सहकार विभागाकडे दाखल केला होता. नगरचे तत्कालीन खासदार मोतीभाऊ फिरोदिया, मारुतराव घुले पाटील (दहिगावने),डॉ.एस.व्ही.निसळ, मोतीलाल बोरा,चंद्रकांत दळवी (हंगा), विश्‍वनाथ मुसमाडे अप्पासाहेब कदम (देवळाली प्रवरा), जगन्नाथ बनकर (पढेगाव), हरिभाऊ शेळके (शिर्डी), के.बी.रोहमारे (कोपरगाव), काशिनाथ धनवटे (पुणतांबा), बाळासाहेब काळे (सारोळा कासार), बाळकृष्ण देवचक्के, सखाराम पाटील (नेवासा), पंढरीनाथ आंबारे (अकोले), नारायण उंबरकर (आश्‍वी), पुरुषोत्तम यादवाडकर या प्रवर्तकांच्या प्रयत्नांतून जिल्हा बॅंकेची ३ ऑक्टोबर, १९५७ रोजी स्थापना झाली. १ मे १९५८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन होऊन बॅंकेच्या कामकाजाला सुरवात झाली. जिल्ह्याचे सुपूत्र तत्कालीन सहकार मंत्री बाळासाहेब भारदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मोतीभाऊ फिरोदिया हे बॅंकेचे पहिले सरकार नियुक्त अध्यक्ष होते. 
नगर जिल्ह्यात आशिया खंडात अग्रगण्य असलेली अ.नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकही आशिया खंडातील आघाडीची सहकारी बँक म्हणून ओळखली जाते.बँक स्थापनेत आणि ती वाढविण्यात घुले घराण्याचे मोठे योगदान आहे.

लोकनेते मारुतराव घुले पाटील हे स्थापनेपासून संचालक तर १९७८ ते १९७९,१९७९ ते १९८०, १९८७ ते १९९२ असे ६ वेळा बँकेचे अध्यक्ष होते.
त्यानंतर त्यांचे अनुयायी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग अभंग हे सलग २ वर्षे अध्यक्ष होते. दि.२४ नोव्हेंबर २०२५ रोजी
चंद्रशेखर घुले यांच्या रूपाने जिल्हा सहकारी बँकेचे नेतृत्व घुले घरण्याकडे आले होते.

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुकीसाठी शेवगाव तालुका सेवा सोसायटी मतदारसंघातून बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील यांचे दोन अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यामुळे चंद्रशेखर घुले पाटील यांचा बिनविरोध होण्याचा मार्ग यापूर्वीच सुकर झालेला होता मात्र रिझर्व बँक व केंद्र सरकारच्या नियमानुसार सहकारी बँकांवर सलग १० वर्षे संचालक राहिलेल्या व्यक्तीला निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आता सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केल्याने
दि.२१ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चंद्रशेखर घुले पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने
सौ.घुले यांची बिनविरोध निवड झाली.
सौ.घुले यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे.
त्याच बरोबर माजी आमदार नरेंद्र पाटील व माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांचा सहकारी सोसायटी, सहकारी साखर कारखाना,सहकारी साखर कारखाना संघातील दीर्घकालीन अनुभवाचाही फायदा सौ.घुले यांना बँकेच्या कामकाजात होईल.त्यांच्या बिनविरोध निवडीने घुले समर्थकांनी दहीगाव-ने,शेवगाव शहर व कारखाना कार्यस्थळावर फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

*अ.नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे स्थापने पासून घुले परिवाराचे बँकेतील प्रतिनिधीत्व…*

१) मारुतरावजी शंकरराव घुले पाटील– १९५७ ते २००२ (संचालक), १९७७-७८(अध्यक्ष), १९७८-७९(अध्यक्ष), १९८६-८७ (अध्यक्ष),
१९८७-८८ (अध्यक्ष), १९८८-९०(अध्यक्ष),
१९९०-९१ (अध्यक्ष).

२) चंद्रशेखर मारुतराव घुले पाटील– २००२ ते २०२६ (संचालक) व २४ नोव्हेंबर २०२५ ते ६ मे २०२६  (अध्यक्ष)

३) सौ.राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील– २१ ऑक्टोबर २०२६ पासून (संचालक)

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!