Monday, October 19, 2026

खेळातून सामाजिक एकोपा वृद्धिंगत होतो-उदयन गडाख

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

सोनई/प्रतिनिधी

सोनई महोत्सवानिमित्त यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व जगदंबा देवी ट्रस्ट यांच्या वतीने माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आगळ्यावेगळ्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री शंकरराव गडाख व अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनीलराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा मंत्री शंकरराव गडाख, सुनीलराव गडाख व यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी क्रिकेट सामन्यांचा आनंद घेतला.

नागरिकांना दैनंदिन कामाच्या व्यापातून आणि धावपळीच्या जीवनातून काही क्षण आनंदाचे मिळावेत, विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींना एकत्र येऊन खेळाचा आनंद घेता यावा, परस्परांतील स्नेहबंध दृढ व्हावेत आणि सामाजिक एकोपा वाढावा, या उद्देशाने या अनोख्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत व्यापारी, डॉक्टर, पोलीस, मेडिकल क्षेत्रातील कर्मचारी, शिक्षक, महावितरण कर्मचारी अशा विविध क्षेत्रांतील संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून सहभागी झालेल्या खेळाडूंनी क्रिकेटच्या मैदानावर चौकार-षटकारांची आतषबाजी करत खेळाचा आनंद लुटला. या स्पर्धेमुळे मैदानावर मैत्री, उत्साह आणि एकोप्याचे वातावरण निर्माण झाले.
याप्रसंगी बोलताना युवा नेते उदयन गडाख म्हणाले की, यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सोनईसह परिसरातील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. अशा उपक्रमांमुळे नागरिकांना विरंगुळा मिळतो, विविध क्षेत्रांतील व्यक्ती एकत्र येतात आणि परस्परांतील स्नेह वाढतो. खेळाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा वृद्धिंगत होतो, असेही त्यांनी सांगितले.
सोनई महोत्सवातील या आगळ्यावेगळ्या क्रिकेट स्पर्धेमुळे खेळाडूंसह क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विविध क्षेत्रांतील नागरिकांना एकाच मैदानावर आणणारा हा उपक्रम सामाजिक सलोखा आणि मैत्री वृद्धिंगत करणारा ठरला.

व्यापारी, डॉक्टर, पोलीस, शिक्षकांसह विविध क्षेत्रांतील संघांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!