नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील प्रसिद्ध उद्योजिका व सामाजिक कार्यकर्त्या सौ.तस्मिया अब्दुल शेख यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक व व्यावसायिक कार्याची दखल घेत ‘राजमाता जिजाऊ उद्योग व्यावसायिक कर्तृत्ववान महिला राज्यस्तरीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
पुणे येथील राजमाता माता जिजाऊ समितीच्या वतीने राज्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.पुणे येथील ऐतिहासिक लालमहाल येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात तस्मिया अब्दुल शेख यांना हा सन्मान मिळाल्याने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.तस्मिया ह्या राष्ट्रवादीचे युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांच्या पत्नी आहेत.
या सन्मानाबद्दल राजमाता जिजाऊ समितीचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. समितीने त्यांच्या कार्याची घेतलेली दखल ही प्रेरणादायी असून, भविष्यातही समाजोपयोगी व व्यावसायिक क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार तस्मिया अब्दुल शेख यांनी व्यक्त केला.
या यशाबद्दल अब्दुलभैया शेख म्हणाले की, “तस्मियाच्या अथक परिश्रम, जिद्द आणि कर्तृत्वाचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. ती भविष्यातही समाजासाठी प्रेरणादायी कार्य करत राहो, हीच सदिच्छा,” असे सांगितले.


