अहिल्यानगर
जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांची लोकहीत व प्रशासकीय कारणास्तव, सहायक ग्रंथालय संचालक, कोकण भवन नवी मुंबई येथे बदली झाली आहे. बदली झाली असली तरी अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रंथालयांचे व कार्यकर्त्यांचे संबंध असे वृद्धिंगत होत राहतील अशी ग्वाही श्री.गाडेकर यांनी दिली.
ते सन 2019 मध्ये जिल्हा ग्रंथालय अधिकारी या पदावर अहिल्यानगर येथे रुजू झाले होते. त्यांच्या बद्दल सर्वांना खूप आदर होता. एका सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचारी म्हणून असलेला अनुभव त्यांच्या पाठीशी होता त्यामुळे ग्रंथालयांच्या व कर्मचाऱ्यांच्या व्यथा त्यांना माहिती होत्या.. तितकेच तें शिस्तीचे ही भोक्ते होते. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात त्यांनी ग्रंथालय व वाचन संस्कृतीमध्ये खूपच चांगली प्रगती केली.
कोरोना काळात लॉक डाउन मध्ये त्यांनी ग्रंथालयातील 25 हजार ग्रंथा ची ऑनलाईन डाटा एन्ट्री पूर्ण करून वाचकांना ई ग्रंथालय अज्ञावली च्या माध्यमातून सेवा सुरु केली आहें.
तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे काम प्रगती पथावर आहें. राहाता व पाथर्डी येथे डिजिटल उपकेंद्र स्थापण केले.आणि अनेक ग्रंथालयांच्या इमारत बांधकामासाठी/साधन सामग्री साठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिसठानच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला. त्यांच्या आदरयुक्त भीतीमुळे जिल्ह्यातील ग्रंथालयांमध्ये सुसूत्रता आली, प्रगती झाली. त्यांच्या सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याच्या पद्धतीमुळे ते सर्वांना आपलेसे वाटात
डिसेम्बर 2023 पासून तें महाराष्ट्र राज्याच्या ग्रंथालय संचालक पदाचा ही पदभार सांभाळत आहेत.
ते जरी कोकण भवन येथे गेले तरी अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रंथालयांचे व कार्यकर्त्यांचे संबंध असे वृद्धिंगत होत राहतील. अशी भावना अहिल्यानगर जिल्यातील ग्रंथालय कार्यकर्ते,, सेवक, वं जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथील अधिकारी,कर्मचारी वं वाचक सभासद यांनी व्यक्त केली आहे.


