पत्रकार राहुल कोळसे गुहा:महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या आणि शारीरिक व लेखी परीक्षांच्या टप्प्यातून यशस्वी होत अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा गावातील निकिता संपत डौले यांची पुणे कारगृह पोलीस पदी निवड झाली आहे. त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संपूर्ण गुहा ,पंचक्रोशी परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लहानपणापासूनच देशसेवेचे स्वप्न पाहणारे निकिता संपत डौले यांनी या भरतीसाठी प्रचंड मेहनत घेतली. कठोर शारीरिक सरावाबरोबरच लेखी परीक्षेचे नियोजन त्यांनी उत्तमरीत्या केले. त्यांच्या या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या आई ज्योती व वडिल संपत डौले यांना दिले .
त्याचबरोबर राहुरी तालुका ज्येष्ठ विधीइ जगन्नाथ डौले , न्यायाधीश महेश डौले , पी एस आय वैभव लांडगे ,समस्त डौले पाटील परिवार , नातेवाईक यांची साथ तिला लाभली . निकीता डौले यांनी मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या या निवडी मुळे विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून तसेच ग्रामस्थांकडून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.


