Thursday, July 9, 2026

लोकनेते मारुतरावजी घुले पाटील हे परमार्थ प्रेमी आदर्श राजकारणी-ज्ञानेश्वर माऊली कदम

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा/नेवासा

घुले पाटील नावाच्या ब्रह्मगिरीतून नेवासा-शेवगाव तालुक्यासह नगर जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा उदयास आल्याने शेतकरी-कष्टकरी आर्थिक-शैक्षणिक दृष्ट्या भक्कम झाला.लोकनेते मारुतरावजी घुले पाटील हे आधार तीर्थ, शिक्षण प्रेमी, आदर्श पिता, कुशल संघटक, परमार्थ प्रेमी आणि आदर्श राजकारणी होते असे प्रतिपादन श्रीक्षेत्र आळंदी येथील ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज यांनी केले.

भेंडा(ता.नेवासा) येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांचे २४व्या पुण्यस्मरणानिमित्त बुधवार दि.८ जुलै रोजी सकाळी १० वाजता भेंडा येथील श्रीसंत नागेबाबा भक्तनिवास मध्ये आयोजित किर्तनाचे कार्यक्रमात कदम महाराज  बोलत होते.

किर्तनाचे प्रारंभी ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज, ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग,उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे, अड.देसाई देशमुख, डॉ.क्षितिज घुले पाटील, राज्य साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितिन पवार  व इतर मान्यवरांनी कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते घुले पाटील यांचे स्मृतिस्थळावर पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

*ज्ञानेश्वर माऊली कदम यांनी कीर्तन सेवेकरिता जगद्गुरू तुकाराम महाराजांचा..
*सुखें घेऊ जन्मांतरें । एक बरें इहलोकीं॥*
*पंढरीचे वारकरी । होतां थोरी जोडी॥*
*हरिदासांचा समागम । अंगी प्रेम विसावे॥*
*तुका म्हणे हे चि मन । इच्छादान मागतसे॥*
हा चार चरणाचा अभंग घेऊन निरूपण केले. कदम महाराज पुढे म्हणाले की, पंढरीच्या विठ्ठलाची वारी करणे आणि त्याचा वारकरी होणे, ही या जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे.पायी चालल्याशिवाय वारी घडत नाही.लोकनेते मारुतराव घुले पाटलांनी साखर कारखान्याला ज्ञानेश्वर माऊलींचे नाव दिले, त्याच बरोबर कारखान्याच्या गेटसमोर माऊलींचे मंदिर ही बांधले.कारखान्याला माऊलींचे नाव असल्यामुळे अल्कोहोल निर्मिती केली मात्र दारू निर्मिती केली नाही,यावरून त्यांचे परमार्थ प्रेम दिसून येते. गोरगरिबांची मुले-मुली उच्चशिक्षित व्हावी यासाठी शिक्षण संस्था काढून ज्ञानाची दालने उघडी करणारे घुले पाटील या परिसराचे कर्मवीर भाऊराव पाटीलच होते. त्यांचे जीवन अविस्मरणीय आहे.घुले पाटील यांना जिल्हा-राज्यस्तरीय -देश पातळीवरील अनेक पुरस्कार मिळाले हे आपल्या नगर जिल्ह्याचे भाग्य आहे. साहेबांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठे केले.घुले पाटील परिवार हा पारमार्थिक परिवार आहे.घुले पाटलांचा विचारांचा आणि विकासाचा वारसा नरेंद्र घुले पाटील व चंद्रशेखर घुले पाटील ही राम-लक्ष्मणाची जोडी पुढे नेत आहेत.

श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे उत्तराधिकारी प्रकाशानंदगिरीजी महाराज, श्रीसदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख उद्धव महाराज मंडलिक, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त देविदास महाराज म्हस्के, राम महाराज झिंजूर्के,
रामनाथ महाराज काळेगावकर, रमेशानंदगिरी महाराज, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक पंडितराव भोसले,अशोकराव मिसाळ,डॉ.नारायण म्हस्के,जनार्धन कदम, मच्छिद्र म्हस्के, बबनराव भुसारी, अड.हिम्मतसिंह देशमुख,अमोल अभंग, विकास नन्नवरे,संतोष पावसे, जनार्दन शेळके, दादासाहेब कोकणे, प्रसाद पटारे, रामनाथ राजपुरे, गोरक्षनाथ भेंडेकर, बाळासाहेब खरड, दत्तात्रय काळे,
कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक रविंद्र मोटे,कामगार संचालक सुखदेव फुलारी, मुळा साखर कारखान्याचे अध्यक्ष भाऊसाहेब मोटे, माजी उपाध्यक्ष कडूबाळ कर्डिले, काशिनाथ नवले, भेडां सरपंच सौ.सुहासीनी किशोर मिसाळ,जनार्धन पटारे, संजय कोळगे, ताहीर पटेल, अनिल मडके,
बबनराव धस,काकासाहेब शिंदे, शिवाजी कोलते, भाऊसाहेब कांगुणे, दादासाहेब गंडाळ, विष्णू जगदाळे, सखाराम लव्हाळे, अजित मुरकुटे, डॉ.शिवाजी शिंदे, गणेशराव गव्हाणे,बाळासाहेब नवले,
अजित रसाळ, आबासाहेब काळे, सुनील गव्हाणे, राजेंद्र चिंधे, अंबादास कळमकर, डॉ.शिरीष लांडगे, डॉ.सुधाकर लांडे, डॉ.रावसाहेब फुलारी, वैभव नवले, हुकुमबाबा नवले, रामभाऊ जगताप, गणेश खंबरे, राम अंधारे, भाऊराव भोंगळे, नाना मडके, कृष्णा ढोरकुले, ज्ञानदेव खरड, बाळासाहेब वडघने, हनुमंत पातकळ, कैलास नेमाणे, अरुण पवार,भारत मोटकर, ज्ञानदेव घोरतळे, शिवाजीराव गवळी, संतोष धस, विजय डहाळे, संतोष जाधव, तुषार लांडे, जाकीर कुरेशी, गजानन देशमुख, सुनील काकडे, विक्रांत लांडे, राहुल बेडके, विजयकुमार नवले, महंमद आतार, नंदकुमार पाटील, भानुदास कावरे, दत्तात्रय पोटे, मिलिंद कुलकर्णी, अंबादास कोरडे, आबासाहेब ताकटे, एकनाथ बर्गे, कचरदास गुंदेचा, शेषराव साबळे, दत्तात्रय माळवदे, बाळासाहेब धोंडे, दत्तात्रय विधाटे, विठ्ठल परदेशी, शरद वाकचौरे, बाळासाहेब मरकड, शहादेव खोसे, विक्रांत लांडे,रामदास कदम,महेश मोटे,राहुल मोटे, अनिल गायकवाड, अंबादास चव्हाण, भाऊसाहेब सावंत, कामगार संघटनेचे सचिव संभाजीराव माळवदे, अण्णासाहेब गर्जे आदींसह उस उत्पादक शेतकरी,विविध संस्थाचे पदाधिकारी,सभासद, कारखान्याचे अधिकारी व कामगार मोठया संख्येने उपस्थित होते. 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!