नेवासा/प्रतिनिधी
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे दृष्टीने नेवासा शहरात पोलीस दलाचा रूट मार्च संपन्न झाला.
अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. सुदर्शन मुम्मका यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नीरज राजगुरू यांच्या सूचनेनुसार नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नेवासा पोलिसांकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे.
त्याच अनुषंगाने आज नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. २९ रोजी सायंकाळी १७:०० ते १८:०० वाजेच्या दरम्यान नेवासा खुर्द शहरातून भव्य रूट मार्च काढण्यात आला.
या रूट मार्चमध्ये नेवासा पोलीस स्टेशनचे ०४ पोलीस अधिकारी, २० अंमलदार, दंगल नियंत्रण पथकाचे ०२ इन्चार्ज, ४० अंमलदार, राहुरी पोलीस स्टेशनचे ०१ अधिकारी, ०४ अंमलदार व राज्य राखीव पोलीस दलाचे (SRPF) – ०१ अधिकारी, २५ अंमलदार असे एकूण ०६ पोलीस अधिकारी व ८९ पोलीस अंमलदार।रूट मार्च मध्ये सहभागी झाले होते.सदर रूट मार्च गणपती चौक, नगरपंचायत चौक, वाखरे चौक, कामिलशहा दर्गा, आयेशा मशिद, सोनार गल्ली, औदुंबर चौक, नाथबाबा चौक या संवेदनशील व मुख्य मार्गावरून काढण्यात आला.
सध्या नेवासा खुर्द शहर व पोलीस स्टेशन हद्दीत शांतता असून उद्याच्या अनुषंगाने योग्य तो चोख बंदोबस्त नेमण्यात आला आहे.तरी सर्व नागरिकांनी शांतता राखावी, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवांना बळी पडू नये, असे आवाहन नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.


