Monday, August 31, 2026

श्रीकृष्ण जयंतीनिमित्त भानसहिवरा येथील तिर्थक्षेत्र शिनाई जागृत देवस्थानमध्ये गोकुळ अष्टमी व गोपाळकाला महोत्सवाची जय्यत तयारी

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:श्रीकृष्ण जयंतीनिमत्त आहिल्या नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रसिद्ध असलेले भानसहिवरा येथील तीर्थक्षेत्र शिनाई देवस्थानमध्ये दि. ०५ व ०५ सप्टेंबर असे दोन दिवशीय श्रीकृष्ण जयंती व गोपाळकाला महोत्सव साजरा होत असून या गोकुळ अष्टमी व गोपाळकाला महोत्सवाची देवस्थानचे प्रमुख राष्ट्रसंत सद्गुरू श्री श्री १००४ महंत गुरूवर्य श्री दिगंबर बाबाजी आराध्य व उत्तराधिकारी बालब्रह्मचारी ज्योतिषाचार्य महंत आवेराजजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली येथे जय्यत तयारी सुरू आहे. तसेच जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील संत महंत, अध्यात्मिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी. उपस्थित राहणार आहे.

श्रीकृष्ण जयंती गोपाळकाला महोत्सवाच्या निमित्ताने शुक्रवार दि.०६ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता शिनाई मातेस राष्ट्रसंत गुरूवर्य बाबाजी व उत्तराधिकारी बाबाजींच्या हस्ते महाभिषेक, दुपारी १२ वाजता महाआरती, दिवसभर फराळ वाटप कार्यक्रम, सायंकाळी ९.३० ते ११.३० किर्तन भजनानंतर रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा होणार आहे.

शनिवार दि. ०५ सप्टेंबर रोजी गोपाळकाला उत्सवाच्या निमित्ताने सकाळी ९ ते ११ देवाच्या रथाची गावातून सवाद्य मिरवणूक निघणार असून सर्वच क्षेत्रातील तरूण मंडळांच्या ठिकठिकाणी दहिहंडी फोडण्याचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर मिरवणुकी चा समारोप देवस्थानच्या महाद्वाराजवळ होणार आहे.

यावेळेत राष्ट्रसंत सद्गुरू श्री श्री १००४ महंत गुरूवर्य श्री दिगंबर बाबाजी आराध्य व उत्तराधिकारी महंत आवेराज महाराज जी यांच्या हस्ते मंत्रोपचाराने काल्याची दहीहंडी फोडून उपस्थित हजारो भाविकांना संतसेवक परिवार व पंचक्रोशीतील सर्वच तरूण मंडळांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

श्रीकृष्ण जयंती व गोपाळकाला महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित धार्मिक कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तीर्थक्षेत्र शिनाई जागृत देवस्थानचे उत्तराधिकारी ज्योतिषाचार्य बालब्रह्माचारी महंत आवेराजजी महाराज, समस्त ग्रामस्त, संतसेवक परिवार यांनी केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!