Tuesday, September 1, 2026

वडूले शिवारात गांजाची शेती; ४० ते ५० जिवंत झाडांसह १७० किलो सुका गांजा जप्त

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील वडूले शिवारात गांजाची शेती उघडकीस आली असून नेवासा पोलिसांनी ४० ते ५० जिवंत झाडांसह १७० किलो सुका गांजा जप्त केला आहे.

याबाबद अधिक माहिती अशी की,वडूले शिवारातील बबन शंकर देशमुख (वय ६०) यांच्या मालकीच्या शेतीवर छापा टाकला. वडूले शिवारात शेतीमध्ये गांजाची लागवड करून त्याची सुकवून छुप्या पद्धतीने विक्री केली जात असल्याची धक्कादायक माहिती मिळाल्याने नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळालेल्या गुप्त खबऱ्यामार्फत
माहितीनुसार पोलिसांनी सोमवार दि. ३१ रोजी वडूले शिवारात छापा टाकून तब्बल ४० ते ५० गांजाची जिवंत झाडे तसेच सुमारे १७० किलो वाळवलेला गांजा जप्त केला.
या कारवाई दरम्यान शेतात गांजाची ४० ते ५० जिवंत झाडे आढळून आली. तसेच मोठ्या प्रमाणात वाळवलेला गांजा पोलिसांच्या हाती लागला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची पंचांसमक्ष नोंद करून तो ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनःप्रभावी पदार्थ अधिनियम (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नेवासा पोलीस ठाण्यात सुरू आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली नशामुक्त अहिल्यानगर’ अभियानांतर्गत जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात प्रभावी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासे पोलिसांनी ही कारवाई केली.पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या या मोहिमेचे सर्वसामान्य नागरिकांकडून कौतुक होत आहे.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील यांच्यासह पोलीस हवालदार बंटी काळोखे, वाघमोडे, शेळके, गाजरे, बर्डे, अप्पा वैद्य, गवळी, वाघ, नारायण डमाळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल गीता पवार, सुमित करंजकर, खंडागळे तसेच होमगार्ड जवान सहभागी झाले होते.

*पोलिस निरीक्षकांचे आवाहन…

‘ड्रग्स अथवा अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीबाबत नागरिकांना कोणतीही गोपनीय माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने डायल ११२ किंवा नेवासे पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल,’ असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!