Wednesday, September 2, 2026

वांबोरी चारीचे पाण्याकरिता शिंगवेतुकाई ग्रामस्थांचे उपोषण सुरू

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील शिंगवेतुकाई गावाला वांबोरी चारीचे पाणी मिळावे या मागणीसाठी शेतकरी व ग्रामस्थांनी
नगर येथील मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यालयासमोर उपोषणाचा सूरु केले आहे.

शिंगवेतुकाई गावाला वांबोरी चारीचे पाणी मिळावे या मागणीसाठी शिंगवेतुकाई ग्रामस्थांनी १ सेप्टेंबर रोजी मुळा पाटबंधारे विभाग,अहिल्यानगर येथे उपोषणाचा करण्याचा इशारा दिला होता.

दरम्यान अहिल्यानगर येथील मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील यांनी शनिवार दि.२९ रोजी सांयकाली ६ वाजता शिंगवे तुकाई येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांची भेट घेऊन वांबोरी चारीच्या पाण्यातून शिंगवेतुकाई गावातील बंधारे भरून देण्याचे आश्वासन देत उपोषणा पासून परावृत्त व्हावे अशी विनंती केली.
मात्र कायम स्वरूपीची उपाय योजना करून गावाचा वांबोरी चारी योजनेत समावेश करावा या मागणीवर ग्रामस्थ ठाम राहिल्याने अखेर दि.१ रोजी सकाळी ११ वाजे पासून बेमुदत उपोषण सूरु केले आहे.

योगेश सुरेश होंडे,सतिश थोरात, पांडुरंग होंडे,दत्तात्रय दरंदले,निलेश पवार,एकनाथ विरोधकर,शिवनाथ महाराज, बाळासाहेब गवळी आदि या उपोषणात सहभागी झालेले आहेत.

दरम्यान या उपोषणाची दखल न घेतल्यास ३ सेप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी अर्धनग्न आंदोलन करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!