अहिल्यानगर/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील भेंडे येथील जिजामाता माध्यमिकव उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब मोटे व उच्च माध्यमिक विभागातील मराठी विभागाचे प्रा संतोष सोनवणे यांना नुकताच अहिल्यानगर येथे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
१०६.४ एफ एम रेडीओ आयोजित स्वामी विवेकानंद विद्या प्रसारक मंडळ,चंदूकाका ज्वेलर्स ,महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज, महावीर ग्रुप,अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या सहकार्याने आयोजित जिल्हास्तरीय आदर्श प्राचार्य व शिक्षक यांचा सन्मान सोहळा आहित्यानगर येथे अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या प्रमुख व मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील शैक्षाणिक कर्तृत्वसंपन्न शिक्षकांचा सन्मान करण्यात आला .
या यशाबदल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग ,उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे ,सचिव अनिल शेवाळे, सहसचिव रविंद्र मोटे ,प्रशासकिय अधिकारी प्रा भारत वाबळे आदीसह संस्थेचे विश्वस्त मंडळ यांनी अभिनंदन केले.


