Sunday, October 25, 2026

श्रीक्षेत्र देवगड येथे राज्यस्तरीय कामगार भजन प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील देवगड येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आज सोमवार दि.२६ ते बुधवार दि.२८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत १७ वे राज्यस्तरीय कामगार भजन प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले
आहे.

सोमवार, दि.२६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता
पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांचे अध्यक्षतेख़ाली तसेच
महंत भास्करगिरीजी महाराज, आमदार विठ्ठलराव लंघे,लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील,कामगार उपसचिव श्रीमती रोशनी कदम-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन होणार आहे.

या तीन दिवसीय शिबिराच्या माध्यमातून राज्यभरातील कामगारांना भजन, कीर्तन व पारंपारिक संगीताचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्य भरातून २०० हून अधिक कामगार सहभागी होणार असून प्रसिद्ध भजनाचार्यांकडून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. शिबिर संचालक कृष्णा महाराज उगले व इतर पाच प्रशिक्षक शिबिरार्थी यांना मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे प्रभारी कल्याण आयुक्त नंदलाल राठोड व नाशिक विभागाच्या प्रभारी सहाय्यक कल्याण आयुक्त श्रीमती भावना बच्छाव व विभागातील कर्मचारी हे विशेष परिश्रम घेत आहेत.

या तीन दिवशीय शिबिराचा समारोप बुधवार दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांचे अध्यक्षतेखाली व श्रीराम सेवाश्रमाचे प्रमुख महंत सुनिलगिरी महाराज,अशोक सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष देवकर, मुळा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांचा उपस्थित होणार आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!