Sunday, December 22, 2024

नगर लोकसभा: या पक्षाकडून उमेदवारांची घोषणा; लढत रंगणार…

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: लोकसभेच्या निवडणुका काही दिवसात होत आहे त्या दृष्टीने सर्वच पक्ष तयारीला लागलेले आहे.नगर दक्षिण मध्ये अनेक जण इच्छुक आहे त्यांनी तशी तयारी सुरू केलेली आहे.

भाजपाचे विद्यमान खासदार सूजय विखे तयारी करत आहे. तर दुसरीकडे भाजपा कडून राम शिंदे यांनीही उमेदवारी मागितली आहे असे बोलले जात आहे . तसेच राष्ट्रवादी काँग्रेस कडूनही अनेक नावे चर्चेत येत आहे.

दरम्यान नगर दक्षिण मधून राष्ट्रीय समाज पक्षांनी उमेदवार जाहीर केला आहे.राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद वाढत आहे. राज्यातील ९० हजार ७०० पोलिंग बूथपैकी ६२ हजार बूथ पक्षाने बांधली आहे. पक्ष बारामती, शिरूर, परभणी, माढा,

नगर, नंदुरबारसह राज्यभर लोकसभेची जोरदार तयारी केली आहे. राज्यात माझ्या पक्षाचे खासदार व आमदार होणार हे नक्की आहे. त्यामुळेच सोबत यावे, यासाठी भाजप व काँग्रेस मागे लागले आहेत. मात्र, येणारी लोकसभा राष्ट्रीय समाज पक्ष स्व बळावरच

लढणार असल्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. महादेव जानकर यांनी केली.राष्ट्रीय समाज पक्षाच्या नगर दक्षिण मतदारसंघाचा पदाधिकारी मेळावा आ. जानकर यांच्या उपस्थितीत नगरमध्ये झाला. यावेळी आ. जानकर म्हणाले, माझ्याकडे

इतर पक्षातील अनेकजण तिकीट मागत आहेत. नगरमध्ये पक्षाचे संघटन अजून मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कंबर कसून पायाला भिंगरी लावावी. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे प्रदेश सचिव रवींद्र कोठारी यांची उमेवारी जाहीर करत आहे.

याआधी भाजपबरोबर युती दिली होती मात्र त्यांनी तोंडाला पाणी पुसली भाजप व काँग्रेसने देशाची वाट लावली आहे जनता त्यामुळे आगामी काळात राष्ट्रीय समाज पक्ष म्हणून एक चांगला पर्याय निर्माण होत असल्याचा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!