माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती देऊन कार्यकत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी
मिळो अथवा ना मिळो सौ. अनुराधा नागवडे या उमेदवारी करणार असल्याची घोषणा नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केली.आगामी निवडणुका व राजकीय वाटचालीची दिशा ठरविण्याबाबत
नागवडे समर्थकांची बैठक श्रीगोंदा येथे बुधवारी (दि.७) पार पडली, या वेळी ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे माजी संचालक जिजाराम खामकर हे होते. मंचावर वाळासाहेच नाहटा, बाचासाहेब भोस, राकेश पाचपुते, सुभाष शिंदे,
रामदास झेंडे, मच्छिद्र सुपेकर, शिवाजीराव पाचपुते, सतीश मखरे यांच्यासह नागवडे कारखान्याच्या संचालकांची उपस्थिती होती.पुढे बोलताना नागवडे यांनी मागील दोन विधानसभा निवडणुकीत इतरांना आमदार होण्यासाठी मदत केली.
स्व. बापूंच्या पावलांवर पाऊल ठेवत सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणीमध्ये खंबीरपणे पाठीशी उभे राहत अडचण सोडवण्याचा प्रयन केला. बापूंच्या आशीर्वादाने सत्ता असो अथवा नसो समाजकार्य सुरूच ठेवले,
यात विरोधकांच्या भूमिका अनेकदा चुकीच्या ठरल्या,तरीही कार्यकर्ते नागवडे कुटुंबाच्या पाठीशी ठाम उभे राहिले. सर्वसामान्य जनतेचा आजही नागवडे कुटुंबावर विश्वास आहे. राजकारणात गॉडफादर हवा असतो. ना. अजित पवार यांनी आम्हाला
बेणाऱ्या काळात पाठबळ देण्याची भूमिका घेतली. या प्रक्रियेत राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी महत्वाची भूमिका घेत भेट घडवून आणली. राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याबाबत सर्व कार्यकत्यांच्या सूचना विचारात घेऊन काँग्रेस जिल्हाध्यक्ष
पदाचा अनुराधा नागवडे आणि राजेंद्र नागवडे, या दोघा उभयतांनी बुधवारी (दि.७) राजीनामा पाठविला असल्याचे जाहीर करत येत्या २० तारखेच्या आत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा राजेंद्र नागवडे यांनी या वेळी केली.
विधानसभेवी उमेदवारी मिळो अगर न मिळो अनुराधा नागवडे विधानसभा लढविणार असल्याचे सांगत अनुराधा नागवडे निमित्त आहेत, त्यांच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते आमदार होणार असून, यासाठी महायुती
सरकारचं पाठबळ मिळणार असल्याचे सांगत श्रीगोंदेकरांना अभिमान वाटेल, असं काम करायचं आहे.
राजेंद्र नागवडे, नागवडे कारखाना अध्यक्ष